
अजित दादांवर यापुढे बोलाल तर...; अमोल बालवडकरांचा इशारा
पुणे गुन्हेगारी मुक्त करण्याचा दावा करणाऱ्या अजित पवारांनी “पालकमंत्री एकीकडे पुणे गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे असं म्हणतात आणि दुसरीकडे शहराच्या पुर्वेपासुन पश्चिमेपर्यंत त्यांचे उमेदवार पाहिले तर ते कोणत्या तत्वात बसत” असं मुरलीधर मोहोळ म्हणाले होते. मोहोळ यांच्या या टीकेला भाजपमधून अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केलेल्या अमोल बालवडकारांनी सोशल मिडीयावरती पोस्ट करत उत्तर दिलं आहे.
अमोल बालवडकरांची पोस्ट
गुन्हेगारांना विदेशात पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या गुन्हेगारांचा “आका” बाजूला घेऊन बसणाऱ्या व केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आलेल्या सुसंस्कृत पुणे शहराच्या खासदारांनी आमचे नेते अजित दादा पवार यांना राजकारण शिकवू नये. तुमच्या “काठावर” निवडून येण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही वाटा आहे हे विसरू नका, असं अमोल बालवडकर यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमधे म्हटलं आहे. “गरज सरो वैद्य मरो” अशी तुमची नेहमीची भूमिका योग्य नाही. माझे नेते अजित दादांवर यापुढे बोलल्यास जसाच तसे उत्तर देण्यात येईल. जय जिनेंद्र !
भाजपवर बालवडकरांचा आरोप
पुणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक पक्षप्रवेश झाले, अनेकांना तिकीट नाकारले गेले. त्यापैकीच एक असलेले अमोल बालवडकर यांना पुण्यातील सुस – पाषाण – बाणेर प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपने उमेदवारी नाकारली. तिकीट नाकारल्यानंतर अमोल बालवडकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी माझी गेम केली. पण त्यांना दाखवून देणार की कार्यकर्ता काय असतो. असा इशारा अमोल बालवडकर यांनी दिला आहे. तसेच चंद्रकांत पाटील बाहेरून आले, त्यांच्यामुळे पुणेकरांना त्रास झाला. मेधाताई रडल्या पण मी लढणार.. पुणे महापालिकेवर आता घडीचा झेंडा दिसेल. अजित पवारांनी माझ्यावर विश्वास ठेवला. हा माझा पुनर्जन्म झाला आहे, कारण भाजपच्याच काही नेत्यांनी माझा राजकीय घातपात केला. असा आरोपही त्यांनी केला.