नाशिक: राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. जातिनिहाय गणना, मुख्यमंत्रीपद, अबू आजमी, नाशिक जिल्हा बँक, संजय राऊत आणि अशा अनेक गोष्टींवर त्यांनी भाष्य केले आहे. दरम्यान यावेळी लाडकी बहीण योजनेवर देखील भाष्य केले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, “महात्मा फुले समता परिषद निर्माण झाल्यानंतर आम्ही अनेक रॅली काढल्या. देशभरात इतक्या रॅली झाल्या तेव्हा आमची पहिली मागणी जातिनिहाय जनगणना करा अशीच होती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जनगणना झाली मात्र जातिनिहाय जनगणना झालेली नाही. 52 टक्के ओबीसी समाज आहे म्हणून आम्हाला 27 टक्के आरक्षण मिळाले.”
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “माझ्या आयुष्यात दोन ते तीन वेळा मुख्यमंत्री बनण्याचा योग होता. तो येऊन गेला. काँग्रेस मधून जाताना देखील तुम्ही जाऊ नका तुम्हाला मुख्यमंत्री करतो असे सांगितले होते तरी पण मी शरद पवार यांच्या सोबत गेलो. मुख्यमंत्री होण्याची इच्छा सर्वांनी धरायला हरकत नाही. राजकारणात सगळे अपेक्षा घेऊनच येत असतात.”
लाडकी बहीण योजनेवर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ” दलित आणि आदिवासी समाजासाठी वेगळे निधी असतात. सध्या लाडकी बहीण योजनेचे पैसे इकडून तिकडून गोळा करून पूर्तता करण्यात येत आहे. हळूहळू जसे राज्याचे उत्पन्न वाढेल तेव्हा लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र निधी उभा राहील.”
एप्रिलचा हफ्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात
महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अंतर्गत एप्रिल महिन्याचा हफ्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच, महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये एप्रिल महिन्याची रक्कम जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात ₹1500 इतकी आर्थिक मदत थेट जमा करण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींसाठी गुड न्युज; एप्रिलचा हफ्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात
ही रक्कम एप्रिल महिन्याची असून मे महिन्याची रक्कम अद्याप जमा झालेली नाही. यासंदर्भात अधिकृत माहिती अद्याप शासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. लाभार्थीं महिलांनी आपली रक्कम जमा झाली आहे की नाही, हे खात्री करण्यासाठी आपले बँक खाते तपासावे. आवश्यक असल्यास बँक शाखा, स्थानिक पंचायत कार्यालय किंवा महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.