माफी असावी साहेब! राज ठाकरेंना पत्र लिहून मनसेच्या बड्या नेत्याने दिला राजीनामा
मुंबई : “दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबाबत सुपारी बहाद्दरांनी बोलू नये. कारण हे सुपारी बहाद्दर, टोल नाका असेल किंवा भोंग्यांचे आंदोलन असेल, असं कोणतेही आंदोलन यशस्वी करू शकलेले नाही”, अशी टीका अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी काल केली होती. त्यांच्या या टीकेचे पडसाद उमटल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या संपूर्ण प्रकरणावरुन राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी मनसेवर हल्लाबोल केला आहे.
सूरज चव्हाण काय म्हणाले?
“मनसे हा पक्ष मरण येत नाही म्हणून जिवंत असलेला पक्ष आहे. मनसे पक्षातील पदाधिकारी हे अट्टल गुन्हेगार आहेत आणि अश्या लोकांची संख्या त्यांच्याकडे आहे. या लोकांकडून सुसंस्कृतपणा संदर्भात अपेक्षा ठेवू शकत नाही. आम्ही जिवंत आहोत असा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. अमोल मिटकरी यांना धमकी देणाऱ्या लोकांना मी सांगतो की, वेळ आणि तारीख तुम्ही ठरवा. जिथं यायचं आहे तिथे बोला आणि तुम्हाला आम्ही काय आहोत हे दाखवून देऊ. उगाच माध्यमांसमोर बूम आला तर काही बडबडू नये”, अशा खोचक शब्दांत सूरज चव्हाण यांनी मनसेवर टीका केली.
बाळा नांदगावकर यांना आवाहन
सूरज चव्हाण यांनी बाळा नांदगावकर यांना संपूर्ण प्रकरण जाणून घेण्याचं आवाहन केलं. “बाळा नांदगावकर तुम्ही माहिती घ्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात काय बोलले होते? सुरुवात तुम्ही करायची आणि शेवट आमच्याकडून अपेक्षित करायची? राष्ट्रवादीकडून जशास तसं उत्तर येणार”, असा इशारा सूरज चव्हाण यांनी दिला.