Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणता झेंडा घेऊ हाती? नवाब मलिक राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार? दोन्ही गटाकडून जोरदार स्वागत

याआधी हायकोर्टाने जामीन देण्यास नकार दिला होता. पण सुप्रीम कोर्टात त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण मलिक बाहेर आल्यानंतर एक वेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. मलिकांसमोर कोणता झेंडा घेवू हाती असा पेच निर्माण झाला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 12, 2023 | 08:38 AM
कोणता झेंडा घेऊ हाती? नवाब मलिक राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार? दोन्ही गटाकडून जोरदार स्वागत
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक ( NCP Minister Nawab Malik ) यांना काल सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) जामीन मंजूर करण्यात आलं आहे. तब्बल दीड वर्षांनी ते तुरुंगाबाहेर येणार आहेत. पण वैद्यकीय कारणास्तव  2 महिन्यांसाठी हा जामीन असणार आहे. मनी लॉन्डिंगप्रकरणी (Money laundering) नवाब मलिक यांना फेब्रुवारी 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे मलिकांनी तब्येतीच्या कारणामुळे जामीन मागितला असल्यानं ईडीने त्याला विरोध केलेला नाही. याआधी हायकोर्टाने जामीन देण्यास नकार दिला होता. पण सुप्रीम कोर्टात त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण मलिक बाहेर आल्यानंतर एक वेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. मलिकांसमोर कोणता झेंडा घेवू हाती असा पेच निर्माण झाला आहे.

कोणत्या कारणासाठी मिळाला जमीन
नवाब मलिक यांच्या वकिलांनी कोर्टात दिल्लेया माहितीनुसार नवाव मलिक यांना किडनीचा विकार (Kidney disorder) आहे. नवाब मलिक यांची एक किडनी निकामी झाली आहे, त्यांची प्रकृती ढासळली असल्याचं वकिलांनी म्हटल होतं. मलिक यांची सध्या एकच किडनी कार्यरत आहे. मलिकांवर सध्या कुर्ला इथल्या क्रिटी केअर रूग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. मात्र किडनी ट्रान्सप्लांटसाठी त्यांना अन्य मोठ्या रूग्णालयात दाखल करायचं असल्याने त्यांच्या जामीनाची मागणी करण्यात आली होती.

दोन्ही गटाकडून स्वागत…

दरम्यान, मलिक बाहेर आल्यानंतर अजित पवार तसेच शरद पवार गट दोन्हीकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत मलिक यांचे स्वागत केले आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे व जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करत स्वागत केले आहे. त्यामुळें आता मलिक कोणता झेंडा घेणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

नवाब मलिक कोणत्या गटात जाणार?
नवाब मलिक तुरुंगात गेल्यानंतर बाहेर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले एक शरद पवारांचा आणि दुसरा अजित पवारांचा. त्यामुळे तुरुंगाबाहेर आल्यानंतर नवाब मलिक कोणत्य गटात सहभागी होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. गँगस्टर दाऊदबरोबही त्यांचे संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत अजित पवार नवाब मलिक यांना आपल्या गटात घेणार का हा प्रश्न आहे. अजित पवार गटात आले तर भाजप आणि शिंदे गटाची भूमिका काय असणार याकडेही लक्ष असणार आहे.

नवाब मलिकांना अटक का झाली?
नवाब मलिक यांना मनी लॉण्ड्रींग प्रकरणी (Money Laundering Case) अटक करण्यात आली होती. मुंबईती कुर्ला येथील जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत. मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इक्बाल कासकर (Iqbal Kaskar) यांच्या चौकशीदरम्यान मलिक यांचं नाव समोर आलं होतं. 23 फेब्रुवारी 2022 रोजी नवाब मलिकांना ताब्यात घेण्यात आलं. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग करतो आणि रिअल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉन्ड्रींगच्या माध्यमातून केले जातात. यासंदर्भात जवळपास नऊ ठिकाणी ईडीने (ED) धाडसत्र राबवले होतं.

Web Title: Ncp leader nawab malik will be going which group sharad pawar or ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2023 | 08:37 AM

Topics:  

  • Nationalist Congress Party
  • nawab malik

संबंधित बातम्या

Thane News : सत्ताधाऱ्यांची मेट्रोच्या नावाने निवडणुकीची चाचपणी; जनहित याचिका दाखल करण्याचा काँग्रेसचा इशारा
1

Thane News : सत्ताधाऱ्यांची मेट्रोच्या नावाने निवडणुकीची चाचपणी; जनहित याचिका दाखल करण्याचा काँग्रेसचा इशारा

‘कोणत्याही नेत्यांचा अपमान खपवून घेणार नाही, सत्तेची ही मस्ती उतरवू’; शशिकांत शिंदेंचा इशारा
2

‘कोणत्याही नेत्यांचा अपमान खपवून घेणार नाही, सत्तेची ही मस्ती उतरवू’; शशिकांत शिंदेंचा इशारा

Ratnagiri News : जयंत पाटील यांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; ‘राष्ट्रवादी’चे ‘जोडे मारो’ आंदोलन
3

Ratnagiri News : जयंत पाटील यांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; ‘राष्ट्रवादी’चे ‘जोडे मारो’ आंदोलन

NCP Politics: ‘देवाभाऊ’नंतर राष्ट्रवादीकडून ‘देवा तूच सांग’चे बॅनर्सने पलटवार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
4

NCP Politics: ‘देवाभाऊ’नंतर राष्ट्रवादीकडून ‘देवा तूच सांग’चे बॅनर्सने पलटवार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.