Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रशियाचा हुकुमशाह पुतीन आणि तुमच्यात फरक काय ?’ पंढरपुरमध्ये शरद पवारांनी डागली मोदींवर तोफ

शरद पवार यांची पंढरपूरमध्ये जाहीर सभा देखील पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. 

  • By प्रीति माने
Updated On: Apr 27, 2024 | 05:00 PM
‘रशियाचा हुकुमशाह पुतीन आणि तुमच्यात फरक काय ?’ पंढरपुरमध्ये शरद पवारांनी डागली मोदींवर तोफ
Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने जोरदार प्रचार सुरु आहे. लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार पंढरपुरमध्ये आहेत. शरद पवार यांची पंढरपूरमध्ये जाहीर सभा देखील पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला.

रशियाचा हुकुमशाह पुतीन आणि तुमच्यात फरक काय ?

सभेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले, सत्ता तुमच्या हातात आहे. मात्र तुमच्या विचाराच्या विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यासाठी तुम्ही सत्ता चालवत आहात का? तसे असेल तर रशियाचा हुकुमशाह पुतीन आणि तुमच्यात फरक काय ? आणि रशियामध्ये जी हुकूमशाही आहे ती हळूहळू भारतात आणण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? असे सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदींकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. झारखंड झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले, त्याचप्रमाणे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील तुरुंगात टाकले, तसेच पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या काही मंत्र्यांवर कारवाई केली, महाराष्ट्रात अनिल देशमुखांवरती कारवाई केली. संजय राऊत यांना तुरुंगात पाठवलं, म्हणजेच मोदी हे एका विशिष्ट विचारसरणीचा आग्रह धरणाऱ्या लोकांसाठी हा देश चालवायचा विचार घेऊन ते आज काम करत असल्याची टीकाही पवार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

मिळालेली सत्ता जमिनीवर पाय ठेवून लोकांसाठी चालवायची

पवार पुढे म्हणाले, ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. आज नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीच्या हातात देशाची सत्ता आहे. लोकशाहीमध्ये सत्ता कोणालाही मिळते ती लोकांच्या साठी चालवण्याचा अधिकार असतो. पण मिळालेली सत्ता जमिनीवर पाय ठेवून लोकांसाठी चालवायची भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे. मात्र आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते देशात फिरतायत भाषण देतात. त्यांच्या भाषणांमधून ते नेहरू, राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्यावरती टीका करत आहेत. मात्र नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी कोणत्या एका पक्षाचे नेतृत्व करता कामा नये. त्यांनी देशातील प्रत्येक नागरिक हा आपला आहे आणि त्याची त्याचा विकास करण्याची जबाबदारी आपली आहे ही दृष्टी ठेवणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री सगळ्यांना एकत्र घेऊन चालले पाहिजे. मात्र त्यांची ती भूमिका नाही ते जाहीरपणे जाती धर्मावरती भाष्य करत आहेत. पंतप्रधान मोदी हे ज्या जवाहरलाल नेहरूंनी देशाला लोकशाही पद्धतीने स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्यावर टीका करत असल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी केला.

Web Title: Ncp leader sharad pawar target pm narendra modi for act same as russian dictator vladimir putin nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2024 | 05:00 PM

Topics:  

  • LOKSABHA ELECTION
  • PM Narendra Modi
  • political news

संबंधित बातम्या

पुण्यात महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटता सुटेना; केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले…
1

पुण्यात महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटता सुटेना; केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले…

नगरपरिषदेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी काँग्रेससह शिवसेनेचा पराभव; ‘इथं’ तब्बल 24 उमेदवारांचे डिपॉझिटच जप्त
2

नगरपरिषदेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी काँग्रेससह शिवसेनेचा पराभव; ‘इथं’ तब्बल 24 उमेदवारांचे डिपॉझिटच जप्त

Jalna : आज जालन्यात होणार महायुतीबाबतचा अंतिम निर्णय
3

Jalna : आज जालन्यात होणार महायुतीबाबतचा अंतिम निर्णय

‘प्रशांत जगताप यांना दिलेला शब्द पाळणार’; काँग्रेस नेते वडेट्टीवारांचं मोठं विधान
4

‘प्रशांत जगताप यांना दिलेला शब्द पाळणार’; काँग्रेस नेते वडेट्टीवारांचं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.