Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तर मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन…; ACB ने लिपीकाला रंगेहात पकडल्यानंतर नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आले आहे. या प्रकरणावर नरहरी झिरवाळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 13, 2026 | 02:46 PM
Narhari Zirwal Video Case, Cuffe Parade Police Station, Mumbai Police FIR, Viral Video Controversy 2026,

Narhari Zirwal Video Case, Cuffe Parade Police Station, Mumbai Police FIR, Viral Video Controversy 2026,

Follow Us
Close
Follow Us:
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मंत्रिमंडळात कारवाई
  • मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपीकवर कारवाई
  • मंत्री नरहरी झिरवाळ यांची पहिली प्रतिक्रिया
ACB On Narhari Zirwal : मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाच्या इमारतीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी कारवाई केली. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आले आहे. ही लाच स्वीकारताना संबंधित लिपीकाला रंगेहात पकडल्यामुळे मंत्रीमंडळात खळबळ उडाली. यामुळे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर देखील ताशेरे ओढले जाऊ लागले. दरम्यान, या प्रकरणावर नरहरी झिरवाळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

एसीबीने रंगेहात लाच घेताना पकडल्यानंतर नरहरी झिरवाळ यांचे कार्यालय सील केले आहे. या लाचेच्या व्यवहाराचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास सुरू केला आहे. त्यामुळे कार्यालय सील करण्यात आले आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या लिपिकाने सुरुवातीच्या चौकशीत काही धक्कादायक नावे घेतल्याची चर्चा आहे. ज्यामुळे मंत्र्यांचे खासगी सचिवही संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे बोललं जात आहे. यामुळे नरहरी झिरवाळ यांच्यावर देखील निशाणा साधला जात आहे.

हे देखील वाचा : जीवघेण्या विमान कंपनीवर कारवाई का नको? रोहित पवारांनी उपस्थित केला सवाल

या प्रकरणावर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “संबंधित कर्मचारी हा सरकारी कर्मचारी असून त्याच्या वैयक्तिक कृत्याशी माझा किंवा माझ्या सचिवांचा संबंध नाही. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. जर या लाचखोरीच्या प्रकरणात माझ्यापर्यंत किंवा माझ्या कार्यालयातील इतर कोणापर्यंत धागेदोरे पोहोचले, तर मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन,” अशी स्पष्ट भूमिका नरहरी झिरवाळ यांनी घेतली आहे.

नेमकं प्रकरण काय?

एका परवाना नूतनीकरणाच्या कामासाठी मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यापैकी ३५ हजार रुपये गुरुवारी स्वीकारण्याचे ठरले होते. याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकाऱ्यांनी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर सापळा रचला. यानंतर त्यांनी राजेंद्र ढेरंग यांना पैसे घेताना रंगेहात पकडले आणि त्यांना अटक करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : “तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा ते निष्ठावंत…; मुस्लीम महापौरवरुन टीका करणाऱ्या शिदेंवर संजय राऊतांचा घणाघात

मंत्रालयात एसीबीने कारवाई करण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी काँग्रेस सरकारमध्ये राजेंद्र दर्डा यांच्या कार्यालयावर अशी कारवाई झाली होती. त्यानंतर भाजपचे नेते एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांच्या कार्यालयातील स्वीय सहाय्यकावर लाचखोरीप्रकरणी कारवाई झाली होती. आता नरहरी झिरवाळ हे तिसरे मंत्री ठरले असून त्यांच्या कार्यालयात थेट एसीबीने धडक दिली आहे.

Web Title: Minister narhari zirwal first reaction after acb take action against cabinet secretary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • ACB
  • Narhari Zirval
  • political news

संबंधित बातम्या

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार
1

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम लवकरच होणार जाहीर; अडीच वर्षांपासून जागा रिक्त
2

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम लवकरच होणार जाहीर; अडीच वर्षांपासून जागा रिक्त

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा
3

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आवाहनाचा राज ठाकरेंकडून खरपूस समाचार; म्हणाले, ‘मग शेकडो गाड्यांचा ताफा…’
4

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आवाहनाचा राज ठाकरेंकडून खरपूस समाचार; म्हणाले, ‘मग शेकडो गाड्यांचा ताफा…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.