Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवार गटामध्ये अंतर्गत धुसमुस? प्रवक्तांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये अंतर्गत कलह समोर आला आहे. प्रदेशाध्यक्ष पदावरुन कलगीतुरा रंगला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 12, 2024 | 12:25 PM
शरद पवार गटामध्ये अंतर्गत धुसमुस? प्रवक्तांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण
Follow Us
Close
Follow Us:

बारामती : लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गट एकजुटीने निवडणुकीला सामोरे गेला. बारामतीसह एनेक मतदारसंघामध्ये विजय मिळवला. यानंतर आता मात्र शरद पवार गटातील अंतर्गत धुसमुस बाहेर येऊ लागली आहे. राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यामधील भाषणांमध्ये नेत्यांतील शीतयुद्धाचे संकेत येऊ लागले. त्यानंतर आता प्रवक्त्यांनी केलेल्या सूचक पोस्टमुळे शरद पवार गटामध्ये कलगीतुरा रंगला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या आहेत.

वर्धापन दिनाच्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी आपल्य़ा भाषणामध्ये कोणत्याही नेत्याचे नाव न घेता आपली नाराजी व्यक्त केली. रोहित पवार यांनी पक्षात सुरु असलेल्या काही गोष्टींवर भाषणामध्ये मत व्यक्त केले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये पक्षातील अंतर्गतबाबींवर जाहीरपणे भूमिका मांडू नये आणि सोशल मीडियावर लगेच त्या बाबत व्यक्त होऊ नये अशी भूमिका मांडली. जयंत पाटील यांनी देखील कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नाही. मात्र यानंतर अनेक ट्वीट होत असून अंतर्गत कलह समोर येत आहे.

शरद पवार यांच्या गटाचे प्रवक्ते आणि रोहित पवार यांचे विश्वासू म्हणून विकास लंवाडे ओळखले जातात. त्यांनी 6 जून रोजी केलेल्या ट्वीटवर प्रदेश पातळीवरील नेतृत्वामध्ये बदल व्हावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यांनी लिहिले होते की, निष्ठावान, लढाऊ नेते शशिकांत शिंदे आणि युवा आमदार रोहित पवार यांच्यावर प्रदेश संघटनेची मुख्य जबाबदारी देण्यात यावी. तसंच राष्ट्रीय पातळीवर सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटना वाढवली पाहिजे,” असे स्पष्ट लवांडे ट्वीटमध्ये मांडले होते. त्यामुळे जयंत पाटील यांच्या नेतृत्वावरुन पक्षामध्ये नाराजी असल्याचे उघड झाले. यानंतर आता जयंत पाटील यांच्या विश्वासातील लोकांनी देखील खरमरीत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे..

निष्ठावान ,लढाऊ नेते @shindespeaks युवा आ. @RRPSpeaks
यांचेवर आता प्रदेश पक्ष संघटनेची मुख्य जबाबदारी द्यायला हवी. तसेच सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रीय पातळीवर सुध्दा पक्ष संघटना वाढवली पाहिजे.@supriya_sule @NCPspeaks @PawarSpeaks
— Vikas Lawande (@VikasLawande1) June 6, 2024

जयंत पाटील यांचे विश्वासक व शरद पवार गटाचे प्रवक्ते डॉ. भूषण राऊत यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत अप्रत्यक्षरित्या रोहित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत भूषम राऊत यांनी लिहिले आहे की, ‘राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे कोंबड्या पाळण्याइतके सोप्पे नाहीये…” असा टोला लगावण्यात आला. रोहित पवार यांच्या बारामती अँग्रो या कंपनीवरुन त्यांना हा टोला लगावण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार गटामध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरुन अंतर्गत राजकारण सुरु असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे कोंबड्या पाळण्याइतके सोप्पे नाहीये… — Adv. Bhushan Raut – अ‍ॅड. भूषण राऊत (@AdvBhushanRaut) June 11, 2024

Web Title: Ncp sharad pawar group internal dispute came out on spokesperson tweet that criticizes rohit pawar nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2024 | 12:25 PM

Topics:  

  • jayant patil
  • NCP Sharad Pawar
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
1

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

Maharashtra Politics: पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; ‘चौफेर’ उधळलेल्या वाणीला फडणवीस लगाम घालणार?
2

Maharashtra Politics: पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; ‘चौफेर’ उधळलेल्या वाणीला फडणवीस लगाम घालणार?

गोपीचंद पडळकर- जयंत पाटील वाद चिघळणार? सांगलीत होणार भाजपची इशारा सभा
3

गोपीचंद पडळकर- जयंत पाटील वाद चिघळणार? सांगलीत होणार भाजपची इशारा सभा

Eknath Shinde Photo on Bag : पूरग्रस्तांना मदत की प्बलिसिटी स्टंट? मदतीच्या पिशव्यांवरही एकनाथ शिंदेंचा फोटो, राजकारण तापलं
4

Eknath Shinde Photo on Bag : पूरग्रस्तांना मदत की प्बलिसिटी स्टंट? मदतीच्या पिशव्यांवरही एकनाथ शिंदेंचा फोटो, राजकारण तापलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.