Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अन् विशेष अधिवेशन घ्या …राष्ट्रवादी शरद पवार गटाची मागणी

पुणे आणि मुंबईसह 16 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. या अतिवृष्टीच्या पावसामुळे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 18, 2025 | 03:52 PM
NCP Shashikant Shinde demands declaration of wet drought Maharashtra rain live update

NCP Shashikant Shinde demands declaration of wet drought Maharashtra rain live update

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra rain live update : मुंबई : राज्यामध्ये पावसाने तुफान बॅंटिग सुरु केली आहे. आज सकाळपासून जोरदार वरुणराजाने बरसायला सुरु केली असून मुंबईसह अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. पुणे आणि मुंबईसह 16 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. नागिरकांना कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जनजीवन विस्कळीत होत असल्यामुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अलर्टमोडवर आली आहे. या परिस्थितीमुळे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शरद पवार गटाकडून केली जात आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पावसानंतर शहराची पूर्ण व्यवस्था बिघडल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. शशिकांत शिंदे म्हणाले की, “राज्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबईमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. अनेक भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागामध्ये पंचनामे देखील झालेले नाहीत. ज्या ठिकाणी पंचनामे झाले आहे त्या ठिकाणी मदत पोहचलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन एकेरी 50 हजार रुपयांची मदत करावी,” अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाने केली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

राज्य सरकारकडून निवडणुकांपूर्वी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणत्याही स्वरुपाची कर्जमाफी देण्यात आलेली नाही. यावर देखील शशिकांत शिंदे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “महायुती सरकारची घोषणाच कर्जमाफीची होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत वेळ आली तर कर्जमाफी करू, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरसकट कर्जमाफी करता येत नाही, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे, जर सरकारने लवकरच सरसकट कर्जमाफीची घोषणा केली नाही तर आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठं आंदोलन उभारू,” असा कडक इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मुंबईमध्ये जोरदार पाऊस

मुंबईमध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळी सहा वाजेपूर्वीच्या 48 तासांत जवळपास 200 एमएम पाऊस पडला. आणि आज सकाळपासून सहा ते आठ तासांत तब्बल 170 एमएम पाऊस पडला आहे. म्हणजेच मुंबईत प्रचंड पाऊस पडला आहे. यामुळे मुंबईमधील रस्त्यांना नाल्याचे स्वरुप आले आहे. रस्त्यांवर पाणी साचले असून गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे विद्यार्थी देखील पाण्यामध्ये अडकले आहेत. मुंबईतील लोकल व्यवस्थेवर परिणाम झाला असून रेल्वे रुळावर देखील पाणी साचले आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Ncp shashikant shinde demands declaration of wet drought maharashtra rain live update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • Monsoon Alert
  • NCP President
  • Shashikant Shinde

संबंधित बातम्या

राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सतर्कतेचे निर्देश
1

राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सतर्कतेचे निर्देश

राजकीय पक्षांची चिंता वाढणार? मनोमिलनाला आव्हान देणार तिसरी आघाडी; नाराजांच्या बंडखोरीची शक्यता
2

राजकीय पक्षांची चिंता वाढणार? मनोमिलनाला आव्हान देणार तिसरी आघाडी; नाराजांच्या बंडखोरीची शक्यता

मध्य प्रदेशात पावसाचा कहर, २७५ जणांचा मृत्यू; २५४ रस्ते आणि पूल उद्ध्वस्त
3

मध्य प्रदेशात पावसाचा कहर, २७५ जणांचा मृत्यू; २५४ रस्ते आणि पूल उद्ध्वस्त

प्रशासनावर भीती आहे, अधिकारी दडपणाखाली काम करतात – शशिकांत शिंदे
4

प्रशासनावर भीती आहे, अधिकारी दडपणाखाली काम करतात – शशिकांत शिंदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.