समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन (फोटो सौजन्य-X)
Ganesh Chaturthi 2025 News In Marathi : श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाला झाल्यानंतर सर्वांनाच उत्सुकता लागते ती अबालवृद्धांचा लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. याच उत्साहाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये म्हणून महानगरपालिकेकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. आज (18 ऑगस्ट) पहाटेपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सकल भागात पाणी साचले आहे. ज्या सार्वजनिक मंडळाचे मंडप पाण्याखाली गेले आहेत त्या मंडळांनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून विद्युत रोषणाई संदर्भातील कामे करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले. वेधशाळेचा अंदाज विचारात घेता अजून एक दिवस अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळे गणेश मंडळांनी श्रींच्या मूर्तींबाबत विशेष खबरदारी घ्यावी. सकल भागांमध्ये जलभराव झालेल्या असल्यात नागरिकांच्या मदतीसाठी मंडळांच्या सभासदांनी आवश्यक काळजी पुढाकार घ्यावा. तसेच पावसामुळे परिसरात जलभराव झाल्यास वाहतूक कोंडी तसेच याबाबत काही तक्रार असेल तर विद्युत रोषणाईचे काम शक्यतो बंदच ठेवावे व ही बाब समन्वय निदर्शनास आणखी असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती करण्यात आले आहे.
तसेच गणेशोत्सवासाठी गावी जात आलेल्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा व्यत्यय न येता हा प्रवास सुखकर आणि सुखरूप व्हावा याकरिता वाहतुकीचे नवे नियम लागू करण्यात आले आहे. येत्या 23 ऑगस्टपासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. येत्या 23 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 29 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत, तर 2 सप्टेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून 4 सप्टेंबरला रात्री 8 वाजेपर्यंत, तसेच 6 सप्टेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून ते 8 सप्टेंबरला रात्री 8 वाजेपर्यंत हे बंदीचे आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा हा धावता दौरा असल्याचे सांगत मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम येथील घाटाची पाहणी न करताच शिवेंद्रराजे भोसले यांनी दौरा आटपला. परशुराम घाटात वारंवार घडणाऱ्या अपघात आणि दुरावस्थेकडे मंत्र्यांनी पाठ फिरवली, अशी टीका आणि चर्चा आता होऊ लागली आहे. रायगडनंतर थेट रत्नागिरीमधील महामार्गाची पाहणी करताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी टॉप गिअर टाकला. त्यामुळे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या या धावत्या दौऱ्यामुळे महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांनी टीका केली आहे.