NCP Sunil Tatkare's reaction on the assault case of the Chhawa organization Dharashiv Press Live
Sunil tatkare marathi news : धारशिव : कृषीमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांचा जंगली रम्मी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे वाद पेटला आहे. महाराष्ट्र हा शेतकरी आत्महत्येमध्ये सर्वात पुढे असताना कृषीमंत्री विधीमंडळामध्ये बसून गेम खेळत असल्यामुळे संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. या संदर्भात लातूरमध्ये छावा संघटनेने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली. मात्र छावा संघटनेने पत्त्यांची उधळण केल्यामुळे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जोरदार मारहाण केली. यावरुन राजकीय वातावरण तापले असून सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे धारशिव दौऱ्यावर गेले आहेत. तिथे त्यांनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली. सुनील तटकरे यांच्यासह महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील उपस्थित होत्या. यावेळी काल (दि.20) झालेली मारहाण आणि प्रकरणावर पदाधिकाऱ्यांनी सुनील तटकरे यांच्याकडे तक्रार करत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीवरुन देखील छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्या, या बैठकीनंतर सुनील तटकरे यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सूरज चव्हाण यांना समज दिली असल्याचे देखील सुनील तटकरे यांनी सांगितले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. या प्रकरणावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, काल पत्रकार परिषद असताना आपण सर्वजण होतात. तासभर ही पत्रकार परिषद झाल्यानंतर छावा संघटनेची पदाधिकारी आले. त्यांनी निवेदन दिलं आणि त्यानंतर काय झालं हे सर्वांनी पाहिलं आहे. त्यांनी पत्ते टाकल्यानंतर देखील मी उभं राहून शांतपणे त्यांचं निवेदन घेतलं. एक सभ्य राजकारणी म्हणून मी तिथे सौहार्द म्हणून मी शांतपणे सर्व घेतलं. त्यानंतर मी त्यांना धन्यवाद म्हणून मी गेलो, अशी भूमिका सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे.
सूरज चव्हाणांना समज दिली
पुढे ते म्हणाले की, मी गेल्यानंतर तिथे जे काही झालं त्याचा मी कडक शब्दांमध्ये निषेध केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अशा पद्धतीने कधी करत नाही. जे घडलं आहे ते अत्यंत चुकीचे आहे. ही माझी स्पष्ट त्यासंबंधित भूमिका आहे. सूरज चव्हाण यांना आज राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलावलेले आहे. सूरज चव्हाण हे रात्रीच तिथे गेले आहेत. या संदर्भाक सर्वजण बसून एकत्रित निर्णय घेतील अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सुनील तटकरे पुढे म्हणाले की, अशा मारहाणीचे कधीच मी समर्थन केलेले नाही. माझ्या राजकीय जीवनामध्ये सुद्धा हे कधीही झालेले नाही. मी शेतकऱ्यांबाबत आणि त्यांच्या प्रश्नांबाबत विचारलेल्या सर्व प्रश्नांची सखोल उत्तर दिली आहेत. मी 25 वर्षे आमदार आणि 10 वर्षे खासदार राहिलो आहे. ते निवेदन देताना कितीही मोठ्या बोलत होते आणि पत्ते फेकले तरी मी आदराने त्यांचं निवेदन स्वीकारले आहे, अशी भूमिका सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.