Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai News: वाईत ‘राष्ट्रवादी’ आक्रमक! ऋतुजा शिंदेंच्या घरावार उद्या धडकणार निषेध मोर्चा; बावधनमधील कार्यकर्त्यांचा संताप

राष्ट्रवादीशी गद्दारी केल्याचा आरोप करत वाईत ऋतुजा शिंदे यांच्या घरावार उद्या सोमवारी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांनी शिंदे यांना राजीनामा देण्याचे आव्हान दिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 05, 2026 | 06:18 PM
Wai News: वाईत ‘राष्ट्रवादी’ आक्रमक! ऋतुजा शिंदेंच्या घरावार उद्या धडकणार निषेध मोर्चा; बावधनमधील कार्यकर्त्यांचा संताप
Follow Us
Follow Us:

 

  • वाईत ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!
  • ऋतुजा शिंदेंच्या घरावार उद्या धडकणार निषेध मोर्चा
  • बावधनमधील कार्यकर्त्यांचा संताप
वाई: जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीपासूनच्या पक्षविरोधी विविध घडामोडींचा विराज शिंदे हाच गद्दार मुख्य सूत्रधार आहे. ऋतुजा शिंदे यांनी पक्षाशी केलेल्या गद्दारीचा जाब विचारण्यासाठी, बावधन गटातील राष्ट्रवादी कार्यकर्ते किसन वीर चौकातून, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ऋतुजा शिंदे व विराज शिंदे यांच्या वाई येथील घरावर, उद्या सोमवारी, सकाळी ११ वाजता निषेध मोर्चा  काढण्यात येणार आहे.

गटातील राष्ट्रवादी  कार्यकर्त्यांच्या तातडीच्या बैठकीत  मोर्चाची घोषणा करण्यात आली. बैठकीत, बाजार समितीचे सभापती मोहन जाधव, प्रदेश चिटणीस प्रतापराव पवार, दिलीप पिसाळ, मदन भोसले, निलेश शिंदे, विक्रम पिसाळ, जयसिंग जगताप, यांच्यासह, कार्यकर्त्यांनी  तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. बावधन व शेंदुरजणे गणातील कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश मिळावा, यासाठी अनेक कार्यकर्त्यांमार्फत मकरंद पाटील यांच्या विनवण्या करणाऱ्या, बेईमानी ऋतुजा शिंदे यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हानही बैठकीत गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी दिले.

मोहन जाधव म्हणाले, निष्ठावंतांना डावलून ऋतुजा शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी विरोधात काम केले तरीही राष्ट्रवादीच्या मकरंद पाटील यांच्या सच्चा कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करून त्यांना निवडून आणले. निलेश शिंदे म्हणाले, नेत्यांनी आवश्यक ती सर्व मदत व कार्यकर्त्यांनी पदरमोड करून  बावधनबाहेरचा उमेदवार जिल्हा परिषदेला प्रथमच निवडून आणला. त्यामुळे  या पती-पत्नीची गद्दारी कदापी मान्य होणारी नाही. दिलीप पिसाळ, मदन भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले.

वाई तालुक्यातील भोगावमध्ये अवकाळीचा तडाखा; घरावरील पत्रे उडाले अन्…; प्रांताधिकाऱ्यांनी केली पाहणी

वडील संचालक असलेल्या किसन वीर कारखान्यावर मोर्चा काढणारा विराज शिंदे लबाड आणि राजकारणातील भोंदू आहे. काँग्रेस, शिवसेना अशा सर्व पक्षात फिरून आलेल्याने आता नवा घरोबा केला आहे. तो कोणाशीच निष्ठेने  राहणारा नाही. आज तो कार्यकर्त्यांना मी राष्ट्रवादी काँग्रेसचाच आहे, असे सांगत असला तरी, त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही.

स्वतःच्या परखंदी गावातील कार्यकर्त्यांनी त्याचे वर्तन लक्षात घेऊन, त्याच्या  पक्षप्रवेशास विरोध केला होता. मात्र मकरंद पाटील या नेतृत्वावर असलेल्या निष्ठेमुळे आम्ही प्रामाणिकपणे पक्षाबरोबर राहिलो, असेही कार्यकर्त्यांनी सांगितले. ऋतुजा व विराज शिंदे यांच्यामुळे जिल्ह्यात पक्षाला कमीपणा आला आहे, त्यामुळे त्याच्या घरावरील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन तीव्र निषेध करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Wai News: पाचगणीत ‘सफाई मित्रांचा’ गौरव! नगरपरिषद आणि हिलदारीतर्फे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान

Web Title: Ncp to hold a protest march outside rutuja shindes residence tomorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • Wai News

संबंधित बातम्या

Wai Municipal Council: वाई नगरपालिकेला मोठा झटका!; ५ कोटींच्या बायोमायनिंग निविदेला जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती
1

Wai Municipal Council: वाई नगरपालिकेला मोठा झटका!; ५ कोटींच्या बायोमायनिंग निविदेला जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती

Satara News : सर्वोदय सेवा ट्रस्टतर्फे वेलंगमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ‘घर-घर वृक्षारोपण’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
2

Satara News : सर्वोदय सेवा ट्रस्टतर्फे वेलंगमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ‘घर-घर वृक्षारोपण’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.