Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात सफाई मित्रांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार; पांचगणी नगरपरिषद व हिलदारीचा मान्सूनपूर्व उपक्रम

monsoon safety initiative: पंचगणी गिरीस्थान नगरपरिषद आणि नेस्ले प्रणित हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने मान्सूनपूर्व विशेष उपक्रमांतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट, गमबूट आणि आवश्यक सुरक्षा साहित्याचे वितरण करण्यात आले. यासोबतच जून २०२६ मधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सफाई मित्रांचा “उत्कृष्ट सफाई मित्र पुरस्कार” देऊन सन्मान करण्

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 02, 2026 | 08:27 PM
पावसाळ्यात सफाई मित्रांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार; पांचगणी नगरपरिषद व हिलदारीचा मान्सूनपूर्व उपक्रम
Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात सफाई मित्रांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार
  • पांचगणी नगरपरिषद व हिलदारीचा मान्सूनपूर्व उपक्रम
  • उत्कृष्ट सफाई मित्र पुरस्कार देऊन केला गौरव
वाई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पंचगणी गिरीस्थान नगरपरिषद व नेस्ले प्रणित हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने मान्सूनपूर्व विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत सर्व सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट, गमबूट व इतर वैयक्तिक सुरक्षा साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच जून २०२६ महिन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सफाई मित्रांचा “उत्कृष्ट सफाई मित्र पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला.

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!

शहराची स्वच्छता अबाधित राखण्यासाठी प्रतिकूल हवामानातही कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची, आरोग्याची आणि कार्याची दखल घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. उत्कृष्ट सफाई मित्रांची निवड नियमित उपस्थिती, सुरक्षित कामपद्धती, शिस्तबद्ध कामकाज, शासनाच्या योजनांचा लाभ, प्रशिक्षणांमधील सहभाग तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी दिलेल्या योगदानाच्या आधारे करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी हिलदारीचे डॉ. मुकेश कुळकर्णी यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचे महत्त्व, वैयक्तिक सुरक्षा साधनांचा वापर आणि त्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी नगराध्यक्ष श्री. दिलीपभाऊ बगाडे, उपनगराध्यक्ष श्री. प्रकाश गोळे, आरोग्य सभापती सौ. राजश्री सणस, मुख्याधिकारी श्री. पंडित पाटील, सर्व नगरसेवक तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपावेळी नगराध्यक्ष श्री. दिलीपभाऊ बगाडे यांनी हिलदारीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक करत सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानाला प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली.

सुरक्षिततेसोबत आरोग्यालाही तितकेच महत्त्व देत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा ५० हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला असून त्यांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले.

या उपक्रमामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असून, त्यांच्या कार्याचा गौरव करून इतर कर्मचाऱ्यांनाही उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Web Title: Monsoon safety sanitation workers panchgani hilldari award cleanliness drive health checkup program

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 08:27 PM

Topics:  

  • Gutter cleaning
  • Monsoon
  • Wai
  • Wai News

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले
1

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले

Wai News: बजाज चेतक खरेदीचा आनंद ठरला मनस्ताप! साडेतीन महिने उलटले, तरी पासिंग नाही; ग्राहक महिलेची फरफट
2

Wai News: बजाज चेतक खरेदीचा आनंद ठरला मनस्ताप! साडेतीन महिने उलटले, तरी पासिंग नाही; ग्राहक महिलेची फरफट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.