
माथेरान हे पर्यटन स्थळ ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी येणारे पर्यटक यांच्यामुळे पर्यटकांच्या गर्दीने फुल्ल होत असते. त्यात माथेरान मध्ये येणारी वाहने हि मोठ्या संख्येने आल्यावर वाहतूक कोंडी नेरळ माथेरान घाटरस्त्यात होत असते. त्यानंतर वाहतूक कोंडीत दोन तीन तास पर्यटकांची वाहने अडकून पडण्याच्या घटना यावर्षी दर शनिवार आणि रविवार घडत होत्या. त्यात सलग सुट्ट्या लागून आल्यानंतर देखील पर्यटकांची वाहने अडकून पडत असल्याने जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी यावर ठोस उपाययोजना करण्यावर भर दिला.
जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर जनावरे रस्त्याचा अभ्यास करून वाहतूक कोंडी होणारी स्थाने निश्चित केली आणि त्यानुसार ख्रिसमस ते नवीन वर्षाचा पहिला दिवस या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वाहतूक पोलिसांचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्ह्याचे वाहतूक भुजबळ यांना सर्वाधिकार देत वाहतूक कोंडीत कोणी अडकणार नाही यावर नियोपन करण्याचे धोरण निश्चित केले.
त्यानुसार माथेरान या पर्यटन स्थळे जाणारे पर्यटक यांची संख्या आणि खासगी वाहने घेऊन जाणारे पर्यटक यांची संख्या लक्षात घेऊन दस्तुरी नाका शिवाय नेरळ येथे कल्याण कर्जत रस्त्यावर माथेरान नाका असलेल्या हुतात्मा चौकात वाहतुकीचे नियोजन करणारे पॉईंट बनवले.हुतात्मा चौकात नेरळ पोलीस ठाण्यातील वाहतूक कर्मचाहरी अहिरे यांच्या सोबतीला सुरेश पाटील आणि पांडुरंग केंद्रे यांना पाठवून वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्याचा पर्यटन केला आहे. त्यात ते तिघे वाहतूक पोलीस सकाळी बंदोबस्तात उभे असतात.
माथेरान दस्तुरी नाका येथील वाहनतळ फुल्ल झाल्यावर खाली नेरळ येथे निरोप येतो.त्यानंतर माथेरान कडे जाणारी सर्व खासगी वाहने यांना नेरळ येथे वाहने पार्किंग करण्याची सूचना केली जाते.वाहने पार्क करून नेरळ माथेरान टॅक्सी सेवेने माथेरान करीत पाठवण्यात येते. त्यामुळे ख्रिसमस सणासाठी बहुसंख्येने पर्यटक आलेले असताना देखील नेरळ माथेरान घाटरस्ता जाम झालेला नाही. त्याचवेळी काळाचा शनिवार आणि आजचा रविवार देखील मोठ्या संख्येने पर्यटक आलेले असताना नेरळ माथेरान घरातसा वाहतूक कोंडीत सापडला नाही.
Ans: रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी पूर्वनियोजन केल्यामुळे यंदा घाटरस्त्यावर वाहतूक कोंडी झाली नाही.
Ans: ख्रिसमसपासून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापर्यंत या कालावधीत विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले होते.
Ans: वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे आधीच निश्चित करून त्या ठिकाणी अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली.