Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात 526 अनधिकृत शाळांचे जाळे; शिक्षण विभागाची केवळ 8 शाळांवर कारवाई, दंडही वसूल

राज्यातील ५२६ अनधिकृत शाळांपैकी केवळ ४३ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक अनधिकृत शाळा मुंबई संचालनालयाच्या विभागात आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 11, 2026 | 07:45 AM
राज्यात 526 अनधिकृत शाळांचे जाळे; केवळ 8 शाळांकडून दंड वसूल

राज्यात 526 अनधिकृत शाळांचे जाळे; केवळ 8 शाळांकडून दंड वसूल

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रात अनधिकृत शाळांची संख्या सातत्याने वाढत असताना त्यांच्याविरोधातील शिक्षण विभागाची कारवाई मात्र अत्यंत संथ असल्याचे समोर आले आहे. राज्यात एकूण ५२६ अनधिकृत शाळा आढळून आल्या आहेत. त्यापैकी केवळ १५५ शाळांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर ४२९ शाळांना दंडात्मक नोटिसा बजावण्यात आल्या असल्या, तरी केवळ ८ शाळांकडून दंड वसूल करण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे.

शिक्षण विभागाच्या (माध्यमिक व उच्च माध्यमिक) अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यातील ५२६ अनधिकृत शाळांपैकी केवळ ४३ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक अनधिकृत शाळा मुंबई संचालनालयाच्या विभागात आहेत. मुंबई विभागात तब्बल ४५२ अनधिकृत शाळा आढळल्या असून, त्यापैकी केवळ २३ शाळांवर बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. पुणे विभागातील ५३ पैकी १४ आणि नागपूर विभागातील ११ पैकी ५ अनधिकृत शाळा बंद करण्यात आल्या आहेत. नाशिक विभागात ४, छत्रपती संभाजीनगर विभागात ४, तर अमरावती विभागात २ अनधिकृत शाळा आढळल्या आहेत.

Campus Placement Tips : प्लेसमेंटच्या टेन्शनमुळे त्रस्त आहात का? मग प्लेसमेंटमध्ये यश मिळवण्यासाठी ट्राय करा या ५ टिप्स

शिक्षण विभागाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह

सरकारी नियमांनुसार, विनामान्यता शाळा चालवणाऱ्यांविरोधात कठोर दंडात्मक कारवाई करण्यासह गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. मात्र, ४२९ शाळांना दंडात्मक नोटिसा बजावल्यानंतरही केवळ ८ शाळांकडून दंड वसूल झाला आहे. त्यामुळे अनधिकृत शाळांविरोधातील शिक्षण विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अंतिम मान्यतेपूर्वीच शाळा सुरू

अनेक संस्था आशयपत्र (लेटर ऑफ इंटेंट) मिळाल्यानंतर अंतिम मान्यता मिळण्यापूर्वीच शाळा सुरू करत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे राज्यातील अनधिकृत शाळांची संख्या वाढत आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या सुरुवातीलाच सर्व अनधिकृत शाळांविरोधात तातडीने कारवाई करून त्या बंद करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. आता या निर्देशांची अंमलबजावणी किती वेगाने होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Sangli News : दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Web Title: Network of 526 unauthorized schools in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 07:44 AM

Topics:  

  • Education Department
  • Maharashtra Education

संबंधित बातम्या

नाशिकमध्ये उभारणार ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
1

नाशिकमध्ये उभारणार ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

मोठी बातमी ! राज्यात 30 हजार शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात; शिक्षण आयुक्तांची माहिती
2

मोठी बातमी ! राज्यात 30 हजार शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात; शिक्षण आयुक्तांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.