Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षकांचे वेतन थकले, शिकवणी बंद पडली; सिंहगडच्या १३ शाळांबाबत न्यायालयाचा ‘हा’ मोठा निर्णय

Pune: संस्थेने आर्थिक अडचणींचा हवाला देत २०१७ ते २०२६ या कालावधीतील आरटीई शुल्कप्रतिपूर्तीचे सुमारे १०.५ कोटी रुपये शासनाकडे थकीत असल्याचा दावा केला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 07, 2026 | 08:45 PM
Pune News

Pune News

Follow Us
Follow Us:
  • शिक्षण विभागाच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली
  • सिंहगड संस्थेच्या शाळांमधील शिक्षकांचे वेतन अनेक महिन्यांपासून प्रलंबित
  • पुढील निर्णय न्यायालयीन आदेशानंतरच घेतला जाणार
Pune: शिक्षकांचे वेतन अनेक महिन्यांपासून थकीत असल्याने शिकवणी बंद पडलेल्या सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या १३ शाळांची मान्यता रद्द करण्याच्या शिक्षण विभागाच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शुक्रवारी (६ नोव्हेंबर) झालेल्या सुनावणीत ही कारवाई तूर्तास स्थगित करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. याबाबत शिक्षण उपसंचालक मच्छिंद्रनाथ कदम यांनी माहिती दिली.

सिंहगड संस्थेच्या शाळांमधील शिक्षकांचे वेतन अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. वेतन मिळत नसल्याने शिक्षकांनी शिकवण्यावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन विस्कळीत झाले होते. शिक्षण विभागाच्या तपासणीतही ही बाब समोर आली होती. या प्रकरणी २० जुलै २०२६ रोजी तत्कालीन शिक्षण उपसंचालकांसमोर सुनावणी झाली होती. त्यात संस्थेचे प्रतिनिधी आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापली बाजू मांडली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, शिक्षकांचा बहिष्कार आणि वेतनप्रश्नी तोडगा न निघणे, या बाबी मान्यता रद्द करण्याच्या निर्णयात महत्त्वाच्या ठरल्या होत्या.

Maharashtra News : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड बंधनकारक – मंत्री दादाजी भुसे

दरम्यान, संस्थेने आर्थिक अडचणींचा हवाला देत २०१७ ते २०२६ या कालावधीतील आरटीई शुल्कप्रतिपूर्तीचे सुमारे १०.५ कोटी रुपये शासनाकडे थकीत असल्याचा दावा केला होता. ही रक्कम मिळाल्यास शिक्षकांचे वेतन देता येईल, असेही संस्थेने सुनावणीत सांगितले होते. मान्यता रद्द झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी त्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र, आता न्यायालयाच्या निर्देशांमुळे पुढील निर्णय न्यायालयीन आदेशानंतरच घेतला जाणार आहे.

कारवाई झालेल्या शाळा

– माध्यमिक शाळा :

१. सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, नरहे
२. सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, आंबेगाव
३. सिंहगड पब्लिक स्कूल, खुसगाव
४. आर. एम. डी. स्प्रिंगडेल माध्यमिक स्कूल, वारजे
५. आर. एम. डी. स्प्रिंगडेल माध्यमिक स्कूल, कर्वेनगर-एरंडवणे
६. सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, कोंढवा

– प्राथमिक शाळा

१. सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल, आंबेगाव
२. सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक स्कूल, वडगाव
३. सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा
४. आर. एम. डी. सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल, वारजे

– याव्यतिरिकीत आणखी तीन शाळांवर कारवाई करण्यात आली आहे.

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

सिंहगड संस्थेच्या एकूण १३ शाळांची मान्यता रद्द करण्याची कारवाई शिक्षण विभागाने केली होती. मात्र, या कारवाईला स्थगित करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. त्यामुळे पुढील न्यायालयीन आदेशानुसार कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल.

– मच्छिंद्रनाथ कदम
शिक्षण उपसंचालक

💡

Frequently Asked Questions

  • Que: वेतन नसल्याने शिक्षकांनी कोणते पाऊल उचलले होते?

    Ans: वेतन मिळत नसल्याने शिक्षकांनी शिकवण्यावर बहिष्कार टाकला होता.

  • Que: कोर्टाने या प्रकरणात काय निर्णय दिला आहे?

    Ans: ‘सिंहगड’च्या १३ शाळांवरील कारवाईला कोर्टाने स्थगिती दिली आहे,

Web Title: Court stays action against 13 sinhagad schools salary issue pune news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • Education Department
  • pune court
  • pune news
  • Salary

संबंधित बातम्या

Pune Metro Line 3: पुणेकरांनो लक्ष द्या! दिवाळीनिमित्त हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ च्या वेळांमध्ये मोठा बदल
1

Pune Metro Line 3: पुणेकरांनो लक्ष द्या! दिवाळीनिमित्त हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ च्या वेळांमध्ये मोठा बदल

Marathi Rangbhumi: नाटकाची संकल्पना ते प्रत्यक्ष सादरीकरण; पुण्यात रंगकर्मींचा अनोखा प्रयोग चर्चेत
2

Marathi Rangbhumi: नाटकाची संकल्पना ते प्रत्यक्ष सादरीकरण; पुण्यात रंगकर्मींचा अनोखा प्रयोग चर्चेत

Badminton: मानांकित खेळाडूंना पुण्याच्या लेकींचा दे धक्का! ईशानवी, ध्रुवी अन्…; निकाल वाचून व्हाल थक्क
3

Badminton: मानांकित खेळाडूंना पुण्याच्या लेकींचा दे धक्का! ईशानवी, ध्रुवी अन्…; निकाल वाचून व्हाल थक्क

पाकिस्तानची फाटणार! शत्रूला मारण्यासाठी भारताचे ‘Pralay’ सज्ज; ओडिशाच्या किनारपट्टीवर…
4

पाकिस्तानची फाटणार! शत्रूला मारण्यासाठी भारताचे ‘Pralay’ सज्ज; ओडिशाच्या किनारपट्टीवर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.