Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ravindra Chavan : राजकारणातील सर्वात चर्चेतील नाव! RSS कार्यकर्ते ते भाजप प्रदेशाध्यक्ष झालेले कोण आहेत रवींद्र चव्हाण?

Ravindra Chavan Political information : भाजपला महाराष्ट्रामध्ये नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाले आहेत. रवींद्र चव्हाण हे भाजप प्रदेशाध्यक्ष झाले असून 2002 सालापासून ते राजकारणामध्ये आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 01, 2025 | 06:48 PM
BJP New Maharashtra State President Ravindra Chavan political journey complete information Marathi

BJP New Maharashtra State President Ravindra Chavan political journey complete information Marathi

Follow Us
Close
Follow Us:

Ravindra Chavan Political News : मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. यामध्ये आता भाजप महाराष्ट्राला नवे प्रदेशाध्यक्ष मिळाले आहेत. रवींद्र चव्हाण यांची भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप पक्षामध्ये अनेक वर्षांपासून काम करत असलेले रवींद्र चव्हाण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे कार्यकर्ते आहेत. मागील 25 वर्षांपासून रवींद्र चव्हाण यांनी समाजकारण आणि राजकारण केलेले आहे. आता त्यांच्यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांपूर्वी त्यांच्यावर अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

डोंबिवलीमधील असलेले रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. नगरसेवक पदापासून राजकारणामध्ये सुरुवात केलेले रवींद्र चव्हाण यांनी आता भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा स्वीकारली आहे. 2002 साली त्यांची भाजपच्या युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा प्रवास सुरु आहे. 2009 सालापासून रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमददार म्हणून निवडून आले. त्यांनी डोंबिवलीमध्ये विजयाची हॅटट्रीक केली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

२०१६ साली तत्कालीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या टर्ममध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात रवींद्र चव्हाण यांची वर्णी लागली. तसेच रायगड आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील त्यांनी सांभाळली. 2016 ते 2019 दरम्यान महाराष्ट्र सरकारमधील बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या चार खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्याचबरोबर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे आमदार रवींद्र चव्हाण हे ठरले.

शिंदेंच्या मंत्रिमंडळामध्येही केले काम

2020 साली भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर 2022 साली स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री स्वीकारले. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) आणि अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या दोन खात्यांचा कारभार पाहिला.  तसेच सिंधुदुर्ग आणि पालघर या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी पाहिली. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांच्या नेतृत्वाखाली काम करता आले. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी संघटन पर्व प्रदेश प्रभारी आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष या पदांवर रविंद्र चव्हाण कार्यरत होते.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

रवींद्र चव्हाण यांची उल्लेखनीय कामगिरी

  • श्रीराम जन्मभूमी अयोध्येला महाराष्ट्रातून दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी शरयू नदीजवळ अंदाजे ९,५०० चौ.मी. क्षेत्रफळावर उभारण्यात येणाऱ्या १२ मजली अयोध्या महाराष्ट्र भक्त निवासाचे जमीन अधिग्रहण आणि भूमिपूजन रविंद्र चव्हाण यांनी केले.
  • काश्मीर सफरीवर जाणान्या पर्यटकांच्या मोफत निवास सुविधेसाठी काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय रविंद्र चव्हाण यांनी घेतला. या भवनासाठी जम्मू-काश्मीर मधील बडगाम जिल्ह्यातील इच्चगाम येथे जवळपास १०,११७ चौ. मी. जमीन खरेदी करण्यात आली.
  • अष्टविनायक यात्रा केवळ एका दिवसात करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि रविंद्र चव्हाण यांनी प्रयत्न केले.
  • मॉरिशस महाराष्ट्र मंडळाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा स्थापन करण्यास मोलाचे सहकार्य केले. २०२३ साली या पुतळ्याचे अनावरण मॉरिशसच्या राष्ट्रपतींच्या हस्ते आणि रविदादांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
  • त्यांच्या कार्यकाळामध्ये सार्वजनिक बांधकाम आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या दोन्ही विभागांचे डिजिटलायझेशन झाले.

Web Title: New bjp maharashtra state president ravindra chavan political journey complete information marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 06:48 PM

Topics:  

  • BJP Politics
  • political news
  • Ravindra Chavan

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Mallikarjun Kharge : राजकारणात अजूनही माणूसकी शिल्लक; PM मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावत केली विचारपूस
2

Mallikarjun Kharge : राजकारणात अजूनही माणूसकी शिल्लक; PM मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावत केली विचारपूस

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा
3

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा

Shivsena Dussehra Melava : तेव्हा तुम्ही कुठल्या गोधडीत मुतत होता? शिंदे गटावर टीका करताना संजय राऊतांचा गेला तोल
4

Shivsena Dussehra Melava : तेव्हा तुम्ही कुठल्या गोधडीत मुतत होता? शिंदे गटावर टीका करताना संजय राऊतांचा गेला तोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.