रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष (फोटो- ट्विटर)
मुंबई/Ravindra Chavan Maharashtra Bjp New President:महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र भाजपने संघटनात्मक बदल करत राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांची घोषणा करण्यात आली आहे. आता रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्र भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष असणार आहेत. आज भाजपच्या अधिवेशनात याची घोषणा करण्यात आली आहे.
सोमवारी महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाने केंद्रीय मंत्री किरेण रिजेजू यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. रवींद्र चव्हाण यांचा पदग्रहण सोहळा आज वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात पार पडला.
लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपला कायमस्वरूपी प्रदेशाध्यक्ष मिळवा अशी मागणी होत होती. रवींद्र चव्हाण ही महाराष्ट्र भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होते. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी ते योग्य असल्याचे म्हटले जाऊ लागले. तसेच दुसऱ्या कोणत्याही नेत्याने प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज न भरल्याने रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे.