Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC: “फसवणूक केल्यास FIR दाखल करून…”; एसटी बसेसच्या हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

हॉटेल थांब्याची शिफारस करताना त्या क्षेत्रातील आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी व विभाग नियंत्रक यांनी प्रत्यक्ष भेटून पाहणी करणे अपेक्षित आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 13, 2025 | 09:33 PM
MSRTC: “फसवणूक केल्यास FIR दाखल करून…”; एसटी बसेसच्या हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसापूर्वी पंढरपूर दौऱ्यावर असताना अचानक एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याला भेट दिली. तेथे असलेल्या प्रवाशांच्या सोयी -सुविधा बाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या एसटी महामंडळाने त्वरित एक परिपत्रक काढून संपूर्ण राज्यातील अशा हॉटेल-मोटेल थांब्या बाबत नवीन आचारसंहिता जारी केली आहे.

यापुढे नवीन हॉटेल थांब्याला पारदर्शक निविदा प्रक्रियेद्वारे मान्यता देत असताना ती ३ वर्षासाठी दिली जाईल परंतु १ वर्षानंतर संबंधित हॉटेल थांब्यावरील सेवा- सुविधाचा फेर आढावा घेऊन पुढील २ वर्षीच्या मुदत वाढी बाबत विचार केला जाणार आहे. तसेच या हॉटेल थांब्याची निवड करताना तेथील स्वच्छता, अन्नपदार्थ दर्जा आणि बसेसची पार्किंग व्यवस्था यांचा प्राधान्याने विचार केला जावा, असे देखील निविदा प्रक्रियेत नमूद केले जाणार आहे.

या हॉटेल थांब्याची शिफारस करताना त्या क्षेत्रातील आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी व विभाग नियंत्रक यांनी प्रत्यक्ष भेटून पाहणी करणे अपेक्षित आहे. त्यांच्या वस्तुस्थितीजन्य अहवालाच्या आधारे संबंधित हॉटेल थांब्याला मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात या हॉटेल थांब्या संदर्भात कोणतीही प्रवासी तक्रार उद्भवल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या वर जबाबदारी निश्चित करुन कडक कारवाई करण्यात येणारा आहे.

तसेच संबंधित हॉटेल महामंडळाची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर एफ. आय. आर. देखील दाखल केला जाईल अशी तरतूद करण्यात आली आहे. तसेच मार्ग तपासणी पथकाच्या माध्यमातून वेळोवेळी या हॉटेल थांब्याची तपासणी करण्याच्या सूचना देखील मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आलेले आहेत. एकंदर प्रवाशांना योग्य प्रकारे सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी या हॉटेल थांब्याची निवड करावी, तसेच त्यातून एसटी महामंडळाचा महसूल देखील वाढवा अशा दुहेरी उद्देशाने नवे हॉटेल- मोटेल धोरण एसटी महामंडळाने जारी केले आहे.

परिवहनमंत्र्यांचे एसटी प्रशासनाला निर्देश

लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील 15 दिवसांत सादर करण्याच्या सूचना देखील परिवहनमंत्र्यांनी दिल्या.

प्रवाशांना चांगली सुविधा न देणाऱ्या हॉटेल-मोटेल थांबे रद्द करा; परिवहनमंत्र्यांचे एसटी प्रशासनाला निर्देश

लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा-नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु, अनेक हॉटेलमधील थांब्याबाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून, प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, फराळाचे जिन्नस शिळे, अशुद्ध व महाग असणे, याचबरोबर संबंधित हॉटेलवरील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एसटी प्रवासांच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा प्रकारच्या तक्रारी उद्भभवत आहेत. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला याबाबत कडक धोरण स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: New code of conduct implemented regarding hotel motel stops of st buses after minister pratap sarnaik visit marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 09:33 PM

Topics:  

  • msrtc
  • Pratap Saranaik
  • Restaurants

संबंधित बातम्या

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…
1

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Pratap Sarnaik: १३६ उमेदवारांना एसटी महामंडळात नियुक्ती, प्रताप सरनाईक यांच्या सूचना
2

Pratap Sarnaik: १३६ उमेदवारांना एसटी महामंडळात नियुक्ती, प्रताप सरनाईक यांच्या सूचना

Pratap Sarnaik : एसटीचे लवकरच रिटेल इंधन विक्रीत पदार्पण, परिवहनमंत्र्यांची माहिती
3

Pratap Sarnaik : एसटीचे लवकरच रिटेल इंधन विक्रीत पदार्पण, परिवहनमंत्र्यांची माहिती

Mira Bhayander News : परिवहन विभागाचा निष्काळजीपणा ; धोकादायक बसेसमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ
4

Mira Bhayander News : परिवहन विभागाचा निष्काळजीपणा ; धोकादायक बसेसमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.