Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Traffic News: राज्यभर अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवा; प्रताप सरनाईक

महामार्ग अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा सविस्तर अहवाल येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सादर करण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी संबंधित विभागांना दिले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 10, 2026 | 05:45 PM
Traffic News: राज्यभर अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवा; प्रताप सरनाईक
Follow Us
Close
Follow Us:

तपासणी मोहीम राबवण्याचे प्रताप सरनाईकांचे आदेश
मुंबई-पुणे हायवेवर झालेली प्रचंड वाहतूक कोंडी
नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अवजड वाहनांवर व्यापक आणि पारदर्शक तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश प्रताप सरनाईक यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मोटार परिवहन व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट शब्दांत सूचित केले.अपघात रोखायचे असतील तर नियमांची केवळ अंमलबजावणी नव्हे, तर जागरूकतेची चळवळ उभी राहिली पाहिजे.

३ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातामुळे तब्बल ३२ तास महामार्ग वाहतुकीसाठी विस्कळीत झाला. प्रवाशांचे, विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल झाले. प्राथमिक पाहणीत चालकाच्या बेपर्वाईमुळे, वेगाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर भाष्य करताना मंत्री सरनाईक म्हणाले, “चालकांच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीवर नियंत्रण आणि प्रबोधन हीच अपघातमुक्त महामार्गाची गुरुकिल्ली आहे.”

वाहनांच्या तांत्रिक तपासणीला वेग, पारदर्शकतेवर भर

राज्यातील सर्व अवजड वाहनांची तांत्रिक तपासणी काटेकोर आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी, असे निर्देश देण्यात आले. विशेषतः फॉर्म 138/A अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वाहन योग्यता प्रमाणपत्र प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यावर भर देण्यात आला. काही प्रादेशिक परिवहन कार्यालयांतून प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणपत्रे दिल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

लालपरीला मिळाले नवे नाव! नव्या STचे ‘राजमाता जिजाऊ’ असे नामकरण, परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा

‘ब्लॅक स्पॉट’वर विशेष लक्ष

महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट्स) माहिती चालकांपर्यंत पोहोचवणे, त्या भागात प्रवेश करण्यापूर्वी समुपदेशन व सूचना देणे, तसेच पोलीस व परिवहन विभागाने संयुक्तरीत्या जनजागृती मोहीम राबवणे—या उपाययोजना तातडीने अमलात आणण्याचे आदेश देण्यात आले.

एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करावे; परिवहनमंत्र्यांच्या सूचना

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सविस्तर अहवाल

महामार्ग अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा सविस्तर अहवाल येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सादर करण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी संबंधित विभागांना दिले. अपघाताची वेदना अजून ताजी असताना शासनाने घेतलेली ही धडक भूमिका म्हणजे केवळ प्रशासकीय हालचाल नाही, तर प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी उचललेले ठोस पाऊल आहे. नियम, नियंत्रण आणि जागरूकता या त्रिसूत्रीवरच सुरक्षित प्रवासाचा पाया उभा राहणार, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला.

Web Title: Minister pratap sirnaik order to police check all heavy vehicles in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Accident News
  • Pratap Saranaik
  • Traffic News

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात; चालकाचे नियत्रंण सुटले अन् थेट…
1

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात; चालकाचे नियत्रंण सुटले अन् थेट…

कचऱ्याच्या हायवाने विद्यार्थ्याला चिरडल्याने जागीच मृत्यू, एक तास वाहतूक ठप्प
2

कचऱ्याच्या हायवाने विद्यार्थ्याला चिरडल्याने जागीच मृत्यू, एक तास वाहतूक ठप्प

टायर फुटल्याने भरधाव कार उलटली, दोनशे फूट पुढे गेली अन्…; कारमधील तिघे जखमी
3

टायर फुटल्याने भरधाव कार उलटली, दोनशे फूट पुढे गेली अन्…; कारमधील तिघे जखमी

Accident News : दिवे घाटात भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी
4

Accident News : दिवे घाटात भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.