Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली; मदत आणि उपचाराला मिळणार गती

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नवीन ऑनलाईन प्रणाली सुरू होत असून, रुग्णांना मदत जलद मिळणार आहे. अर्ज मंजुरीची प्रक्रिया केवळ ८ तासांत पूर्ण होणार असून, रुग्णालयच थेट अर्ज सादर करणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 12, 2026 | 08:12 PM
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली; मदत आणि उपचाराला मिळणार गती
Follow Us
Close
Follow Us:

नीता परब, मुंबई : राज्यातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत अधिक वेगाने मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्ययावत ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या नव्या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया केवळ कार्यालयीन आठ तासांत पूर्ण होणार असून, रुग्णांना तातडीने मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Central Railway News: मध्य रेल्वेच्या तिजोरीत पैसाच पैसा! वर्षभरात 251 कोटींचा विक्रमी दंड वसूल; आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

या प्रणालीतील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे अर्ज सादर करण्याची जबाबदारी आता थेट रुग्णालयांवर सोपवण्यात आली आहे. रुग्णाने आवश्यक कागदपत्रे संबंधित रुग्णालयात जमा केल्यानंतर रुग्णालय प्रशासनच मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे अर्ज पाठवणार आहे. त्यामुळे रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना स्वतंत्रपणे अर्ज भरण्याची गरज भासणार नाही. यामुळे प्रक्रियेतला वेळ व अनावश्यक धावपळ कमी होऊन उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे.

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन येत्या काही दिवसांत होणार असून, त्यानंतर ही सेवा राज्यभर टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे. गेल्या काही काळापासून रुग्णस्नेही बदल करण्यावर शासनाचा भर असून, ही ऑनलाईन प्रणाली त्याच दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Sangali News : शासकीय रक्तपेढी आणि डायलिसीसची सुविधा; कस्तुरबा रुग्णालयात लवकरच रुग्णांना मिळणार मोफत उपचार

गेल्या आर्थिक वर्षात (१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६) राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना एकूण ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. नव्या प्रणालीमुळे ही मदत अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने वितरित होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे रुग्णांना वेळेत आणि सुलभ पद्धतीने आर्थिक सहाय्य मिळवून देणे. अर्ज प्रक्रियेतील विलंब टाळून उपचारांना गती देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी गरजू रुग्णांनी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: New online system for the chief ministers relief fund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 07:54 PM

Topics:  

  • Chief Minister Of Maharashtra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.