Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मांजरा परिवारातील कारभाराचा नवा पॅटर्न उघडकीस; संगनमत करून शेतकऱ्यांच्‍या ४९ टन ऊसाची चोरी

ऊस तोडणीसाठी आलेल्‍या मांजरा कारखान्‍याच्‍या सर्व संबंधितांनी संगनमत करून शेतकऱ्यांच्‍या ४९ टन ऊसाची चोरी केली असून मांजरा परिवारातील कारभाराचा नवा पॅटर्न यातून उघडकीस आला आहे. चोरीच्‍या या प्रकरणी चेअरमन, कार्यकारी संचालक यांच्‍यासह सर्व संबंधीता विरूध्‍द गुन्‍हे दाखल करावेत अशी मागणी कारखान्‍याचे शेतकरी सभासद भाजपाचे नेते राजेश कराड यांनी केली आहे. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 01, 2022 | 06:51 PM
मांजरा परिवारातील कारभाराचा नवा पॅटर्न उघडकीस; संगनमत करून शेतकऱ्यांच्‍या ४९ टन ऊसाची चोरी
Follow Us
Close
Follow Us:

लातूर : ऊस तोडणीसाठी आलेल्‍या मांजरा कारखान्‍याच्‍या सर्व संबंधितांनी संगनमत करून शेतकऱ्यांच्‍या ४९ टन ऊसाची चोरी केली असून मांजरा परिवारातील कारभाराचा नवा पॅटर्न यातून उघडकीस आला आहे. चोरीच्‍या या प्रकरणी चेअरमन, कार्यकारी संचालक यांच्‍यासह सर्व संबंधीता विरूध्‍द गुन्‍हे दाखल करावेत अशी मागणी कारखान्‍याचे शेतकरी सभासद भाजपाचे नेते राजेश कराड यांनी केली आहे.

गेल्‍या १८-२० महिन्‍यापासून शेतात ऊस उभा असल्‍याने शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात आडवणूक, पिळवणूक आणि छळवणूक होत असताना मांजरा परिवारातील साखर सम्राट मात्र लावणीच्‍या फडात दंग असल्‍याने शेतकरी मोठा असंतोष व्‍यक्‍त करत आहेत.

मांजरा साखर कारखान्‍याचे रामेश्‍वर येथील शेतकरी सभासद हनुमंत तुळशीराम कराड यांचा ऊस कारखान्‍याच्‍या तोडणी कार्यक्रमानुसार ऊस तोडणी यंत्राद्वारे तोडण्‍यात आला. सदरील ऊसाच्‍या वजनाची माहिती घेण्‍याचा प्रयत्‍न केला मात्र अधिकृत मिळाली नाही. आठ दिवसांनी ऊसाची रक्‍कम खात्‍यावर जमा झाल्‍यानंतर संशय आल्‍याने चौकशी केली असता वाहतूक ठेकेदार कालिदास शिंदे यांनी आपल्‍या वडीलांच्‍या नावे ४९ टन कारखान्‍याला ऊस दिला. ऊसाच्‍या ट्रीपची चोरी झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाल्‍याने शुक्रवारी सकाळी मौजे रामेश्‍वर येथे राजेश कराड यांच्‍यासह असंख्‍य शेतकऱ्यांनी मांजरा कारखान्‍याचे काटगाव गटातील गटप्रमुख घोडके, कर्मचारी शेख नजीर, लोमटे आणि वाहतूक ठेकेदार कालिदास शिंदे यांना विचारणा करण्‍यासाठी बोलावून घेतले असता त्‍यांच्‍या चौकशीतून चोरीचा प्रकार उघडकीस आला.

रामेश्‍वर येथील पोलीस पाटील शरद पाटील यांच्‍या मार्फत संबंधीत कर्मचाऱ्यांना पो‍लीस उपनिरिक्षक अशोक घाटगे व त्‍यांच्‍या सहकाऱ्यांकडे सुपूर्द केले. सदर प्रकरणी शेतकऱ्याच्‍या ऊसाची संगनमताने चोरी करणाऱ्या सर्व संबंधीत अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांच्‍या विरूध्‍द गातेगाव पोलीस ठाण्‍यात शेतकरी हनुमंत तुळशीराम कराड यांनी तक्रारी अर्ज देवून गुन्‍हे दाखल करण्‍याची मागणी केली आहे.

शेतकऱ्याच्‍या ऊसाची चोरी केवळ वाहतूकदार अथवा स्‍लीप बॉयने केली नसून कारखान्‍याच्‍या सर्व संबंधीतांची ही साखळी आहे. यातून शेतकऱ्याना लूटण्‍याचा प्रकार केला जात आहे असे सांगून पत्रकारांशी बोलताना राजेश कराड म्‍हणाले की, ऊस तोडणी कार्यक्रमात नाव नसताना अथवा कारखान्‍याचा ऊस तोडणी कोड नसताना मेघराज शिंदे यांच्‍या नावे कारखान्‍याने ऊस घेतलाच कसा असा प्रश्‍न उपस्थित करून संबंधीच्‍या खात्‍यावर ऊसाचे बील जमा होईपर्यंत कोणालाच थांगपत्‍ता लागत नाही याचाच अर्थ कारखान्‍याचे चेअरमन, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, संबंधीत अधिकारी, कर्मचारी हे सर्वच दोषी आहेत.

शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना बसवून ठेवल्‍यानंतर मांजरा कारखान्‍याचे चेअरमन, कार्यकारी संचालक व इतर वरिष्‍ठांना घटनेची माहिती देण्‍यासाठी संपर्क करण्‍याचा प्रयत्‍न केला पंरतू कोणीही उपलब्‍ध होवू शकले नाहीत. व्‍हाईस चेअरमन श्रीशैल्‍य उटगे यांच्‍याशी संपर्क झाला असता त्‍यांनी उडवाउ डवीची उत्‍तरे देवून जबाबदारी झटकण्‍याचा प्रयत्‍न केला. मांजरा परिवारातील पारदर्शक कारभार हाच का असा प्रश्‍न उपस्थित करून राजेश कराड म्‍हणाले की, याप्रकरणी संगनमत करून शेतकऱ्यांच्‍या ऊसाची चोरी करणाऱ्या सर्व संबंधीताविरूध्‍द कठोर कार्यवाही करावी आजपर्यंत अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांच्‍या ऊसाची चोरी झाल्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे याबाबत गंभिरपणे दखल घेवून सखोल चौकशी करून दोषी विरूध्‍द कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना न्‍याय द्यावा अशी मागणी साखर आयुक्‍त, साखर उपसंचालक, जिल्‍हाधिकारी, जिल्‍हा उपनिबंधक यांच्‍याकडे केली आहे.

कारखाना प्रशासनाला शेतकऱ्याबद्दल कसलीच आस्‍था नाही. गेल्‍या १८-२० महिन्‍यापासून शेतात ऊस उभा असल्‍याने शेतकरी चिंताग्रस्‍त असून ऊसाच्‍या तोडणीसाठी अडवणूक आणि पिळवणूक केली जात आहे. स्‍वतःला सहकार महर्षी समजणाऱ्यांनी आतातरी जागे होवून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी. कष्‍टाने घामाने पिकवलेल्‍या ऊसाचा मोबदला द्यावा अशीही मागणी राजेश कराड यांनी केली आहे.

[read_also content=”कारखाने संपूर्ण उसाचं गाळप पार पाडतील; साखर आयुक्तांनी किसान सभेला दिले आश्वासन https://www.navarashtra.com/maharashtra/factories-will-crush-the-entire-sugarcane-sugar-commissioner-assures-kisan-sabha-nrdm-262857.html”]

मांजरा परिवारातील कारखान्‍याच्‍या कारभारातून शेतकऱ्यांच्‍या ऊस चोरीचा नवा पॅटर्न उघडकीस आला असून अतिरिक्‍त ऊसाच्‍या प्रश्‍नी, उन्‍हाळयात पाण्‍याची टंचाई निर्माण झाल्‍याने उभ्‍या ऊसाचे वजन घटले जात आहे याचा कसलाच विचार केला जात नाही. शेतकरी हवालदिल असताना मांजरा परिवारातील साखर सम्राट मात्र लावणी महोत्‍सवाचे आयोजन करून कोटयावधीची उधळपट्टी करून लावणीच्‍या कार्यक्रमात दंग होत आहेत. यामुळे संकटात, अडचणीत सापडलेल्‍या ऊस उत्‍पादक शेतकऱ्यातून तीव्र असंतोष निर्माण होत आहे.

Web Title: New pattern of management in the cat family revealed theft of 49 tons of sugarcane from farmers by conspiracy nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2022 | 06:51 PM

Topics:  

  • Amit Deshmukh
  • cmomaharashtra
  • Shekhar Gaikwad

संबंधित बातम्या

बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची…; काँग्रेसचा बडा नेता संतापला
1

बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची…; काँग्रेसचा बडा नेता संतापला

टोळीप्रमुखासह दहा सराईत गुन्हेगारांना केले तडीपार; पुणे पोलिसांची मोठी कारवाई
2

टोळीप्रमुखासह दहा सराईत गुन्हेगारांना केले तडीपार; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक
3

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक
4

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.