Malegaon Blast Case Verdict: नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये 2008 साली रमजानच्या आदल्या भिक्कू चौकामध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी हा स्फोट झाला. नवरात्री आणि रमजान महिन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला, तर 100हून अधिक लोक जखमी झाले. या प्रकरणाचा तब्बल 17 वर्षानंतर निकाल लागला असून, या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पण या प्रकरणाची चौकशी कऱणाऱ्या माजी एटीएस अधिकाऱ्याने एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना गोवण्याचा प्रयत्न कऱण्यात आल्याचा गौप्यस्फोट माजी एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पण या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर मेहबूब मुजावर कोण आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एक नवीन वळण आले आहे. या प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेले महाराष्ट्राचे माजी एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी दावा केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोटानंतर आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते. यामागे देशात ‘भगवा दहशतवादा’ची संकल्पना स्थापन करण्याचा उद्देश होता. जो पूर्णपणे खोटा होता, असेही मुजावर यांनी म्हटले आहे.
Vice Presidential Election : उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर, ‘या’ तारखेला होणार निवडणूक
एटीएसचे माजी अधिकारी मेहबूब मुजावर यांनी सोलापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. न्यायालयाच्या निर्णयावरून हे सिद्ध होते की, एटीएसचा सुरूवातीचा तपास बनावट होता. या प्रकरणाच्या तपासात काही गंभीर त्रुटी होत्या. एटीएसने एका विशिष्ट अजेंडाखाली काम केले, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले, २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या स्फोटाची चौकशी करणाऱ्या पथकात आपण देखील सामील होतो. या स्फोटात सहा लोक मृत्यूमुखी पडले तर १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. नंतर, प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले.
मोहन भागवत यांना अटक करणे माझ्या क्षमतेबाहेर होते – मेहबूब मुजावर
मुजावर म्हणाले की, त्यावेळीम मला काही अत्यंत गोपनीय आदेश मिळाले होते, ज्यात मोहन भागवत, राम कलसंगरा, संदीप डांगे आणि दिलीप पाटीदार यांच्यासारख्यांची नावे होती. या आदेशांना कोणताही कायदेशीर किंवा तार्किक आधार नव्हता. “मी त्या आदेशांचे पालन केले नाही कारण सत्य काहीतरी वेगळे होते,” ते म्हणाले.
ठरलं! प्राजक्ता गायकवाडने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात
भागवतांसारख्या व्यक्तिमत्त्वाला अटक करणे माझ्या क्षमतेबाहेर होते, पण मी त्यांच्य आदेशांचे पालन केले नाही. त्यामुळए त्यांच्याविरुद्ध खोटा खटला दाखल करण्यात आला, ज्यामुळे त्यांची ४० वर्षांची पोलिस कारकीर्द उद्ध्वस्त झाली, असा आरोपही मुजावर यांनी यावेळी केला. मुजावर यांनी त्यांच्या दाव्यांना समर्थन देण्यासाठी कागदोपत्री पुरावे असल्याचा दावाही केला. “कोणताही भगवा दहशतवाद नव्हता, ते सर्व दावे खोटे होते.अलीकडील न्यायालयाच्या निकालाने हे सिद्ध झाले आहे की या प्रकरणाच्या तपासात काही लोकांना जबरदस्तीने गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असा पुनरूच्चारही त्यांनी यावेळी केला.
मेहबूब मुजावर यांच्या कुटुंबाचा पोलिस खात्याशी खोल संबंध आहे. महाराष्ट्रातील सोलापूर येथील रहिवासी असलेले महबूब मुजावर यांचे वडील अब्दुल करीम हे पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाले. त्यांचे आजोबा दुसऱ्या महायुद्धात लढले. नंतर त्यांनी महाराष्ट्र पोलिसातही सेवा बजावली. अशाप्रकारे महबूब मुजावर यांचे कुटुंब दोन पिढ्यांपर्यंत पोलिसांशी जोडले गेले. मुजावर १९७८ मध्ये महाराष्ट्र पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले. १९८३ मध्ये ते अधिकारीपदाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पोलिस उपनिरीक्षक झाले. १९८४ मध्ये त्यांना साताऱ्यात उपनिरीक्षक म्हणून पहिली पोस्टिंग मिळाली. मुजावर यांचे कुटुंब बरेच श्रीमंत आणि सुशिक्षित आहे. त्यांना तीन मुले आणि दोन मुली आहेत. महबूब मुजावर यांची सर्व मुले डॉक्टर आहेत.
९ वर्षांपूर्वीही खळबळ उडाली
मेहबूब मुजावर यांनी सुमारे ९ वर्षांपूर्वी एक दावा करून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. हा दावा मालेगाव बॉम्बस्फोटाशीही संबंधित होता. त्यावेळी पोलीस निरीक्षक असलेले मेहबूब अब्दुल करीम मुजावर यांनी २०१६ मध्ये एक खळबळजनक खुलासा केला होता आणि दावा केला होता की २००८ च्या मालेगाव हल्ल्यातील दोन संशयितांना आठ वर्षांपूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (महाराष्ट्र एटीएस) ठार मारले होते. तथापि, त्यांच्या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी होऊ शकली नाही. ‘हिंदुस्तान टाईम्स’मधील वृत्तानुसार, मुजावर यांचे सहकारी त्यांच्यावर संशय घेत होते. मुजावर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना निलंबितही करण्यात आले होते.