Maharashtra Monsoon Alert: चला रेनकोट, छत्र्या बाहेर काढा! पाऊस 'या' जिल्ह्यांत असा धुमाकूळ घालणार की...;
पुणे: गेले काही दिवस राज्यात अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने राज्याला पुढील चार ते पाच दिवस अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यातील वातावरण कसे असेल? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. विदर्भ आणि मराठवाडा परिसरात देखील मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेले काही दिवस पुणे, सातारा, मुंबई आणि कोकण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोल्हापुरात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. राज्याच्या विविध भागात संततधार पाऊस सुरु आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यातील पुणे, मुंबई, सातारा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. किनारपट्टी भागात पावसाळा पोषक वातावरण तयार झाले आहे.
हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, पुणे, पश्चिम महाराष्ट्र परिसरात अति ते अति मुसळधार पाऊस होऊ शकतो. मुंबई आणि उपनगरात आज जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन सरकारने केले आहे.
गेले काही दिवस कोकण किनारपट्टी, घाटमाथा, तर पुणे, सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुढील चार दिवस रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
Pune Breaking: पुण्यात कोसळधार; खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढवला, सध्याची स्थिती काय?
कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
पुढील दोन ते तीन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील काही भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.