मुंबई: कारंजा, आनंदवाडी, मिरकरवाडा व ससून डॉक येथील बंदरे ही कोकणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असून यातून तेथील लोकांच्या आर्थिक विकासास चालना मिळेल. या बंदरांच्या ठिकाणी सुरू असलेली विकासकामे गती व पारदर्शकतेने पूर्ण करा, अशा सूचना मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाची आढावा बैठक मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला विभागाचे आयुक्त किशोर तावडे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक, उपसचिव जकाते, सह आयुक्त दिनेश देवरे, प्रादेशिक उपायुक्त प्रकाश भादुले यासह विभाग व महामंडळातील अधिकारी उपस्थित होते.
मंत्री राणे यांनी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाच्यावतीने सुरू असलेल्या बंदरांचा विकास व आधुनिकीकरणाच्या कामांचा आढावा घेतला. यामध्ये मुंबई शहरातील ससून डॉक, रायगड जिल्ह्यातील कारंजा (उरण), सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदवाडी व रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा येथील बंदरांच्या विकासकामांची माहिती घेतली.
येथील बंदरांच्या ठिकाणी मासे लिलाव शेड, बर्फ कारखाना, वर्कशॉप, मासेमारीच्या जाळ्यांची दुरुस्ती व निगा राखण्यासाठी शेड, प्रसाधनगृह यांसह विविध काम केली जात आहेत. सध्या सुरू असलेल्या कामांसाठी ससून गोदी मच्छीमार बंदर येथील विकास कामांसाठी 92 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, आनंदवाडी येथील विकासकामांसाठी 88 कोटी 44 लाख रुपये, मिरकरवाडा येथील विकासकामांसाठी 26 कोटी 23 लक्ष रुपये, कारंजा येथील विकासकामांसाठी 149 कोटी 80 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कोकणातील सात ठिकाणी होत असलेल्या मासे उतरवणी केंद्रातील कामांचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला.
महाराष्ट्र सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ आणि महाराष्ट्र भूजलाशय मच्छीमार कल्याणकारी महामंडळ यांची घोषणा राज्य शासनाने ऑक्टोबर 2024 मध्ये केली आहे. यासाठी मुंबई व नागपूर येथील कार्यालयातील सध्याच्या कार्यरत यंत्रणेमार्फत काम केले जावे. या दोन्ही महामंडळाचे कामकाज तातडीने सुरू होण्यासाठी विभागाने कार्यवाही करावी, असे आदेशही मंत्री राणे यांनी यावेळी दिले.
नितेश राणेंच्या व्यक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ
डिनो मारिया प्रकरणात होणाऱ्या कारवाया आणि या प्रकरणावरून दुर्लक्ष व्हावे यासाठी राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असल्याचे राणे म्हणाले. उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात तुरुंगाची वारी करू शकतो असे खळबळजनक वकव्य राणे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच नवीन चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई नालेसफाई प्रकरणात डिनो मोरियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. डिनो मोरियाच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. याच प्रकरणावरून मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचा मुलगा जेलची वारी करू शकतो असे राणे म्हणाले आहेत.