Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिलासादायक ! पुण्यात GBS आजाराचा नवीन रुग्ण नाही; आरोग्य विभागाकडून माहिती

ससून सर्वोपचार रुग्णालयात 56 वर्षीय महिलेचा जीबीएसने मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ सुरू झाल्यापासून राज्यात मृत्यू झालेला हा दुसरा रुग्ण ठरला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत जीबीएसच्या रुग्णांची संख्या 111 होती

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 31, 2025 | 11:28 AM
दिलासादायक ! पुण्यात GBS आजाराचा नवीन रुग्ण नाही; आरोग्य विभागाकडून माहिती

दिलासादायक ! पुण्यात GBS आजाराचा नवीन रुग्ण नाही; आरोग्य विभागाकडून माहिती

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यातील ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ अर्थात जीबी सिंड्रोमची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यात ही रुग्णसंख्या 127 वर पोहोचली असून, आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सोलापूरात दोन-तीन दिवसांपूर्वी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात शहरात गुरुवारी जीबीएसची लागण झालेला एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. दरम्यान, बुधवारी या आजाराने एका महिलेचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या दोनवर पोचली आहे.

हेदेखील वाचा : Dhananjay Munde : भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठिशी; महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्रींनी मांडली स्पष्ट भूमिका

ससून सर्वोपचार रुग्णालयात 56 वर्षीय महिलेचा जीबीएसने मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ सुरू झाल्यापासून राज्यात मृत्यू झालेला हा दुसरा रुग्ण ठरला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत जीबीएसच्या रुग्णांची संख्या 111 होती. यात रात्री उशिरापर्यंत वाढ झाली. ती 130 पर्यंत पोचली आहे. यामुळे चिंता निर्माण झाली होती. गुरुवारी मात्र एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील 130 संशयित रुग्णांपैकी 73 रुग्णांना जीबीएसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, महापालिकेच्या जुन्या हद्दीतील 25 समाविष्ट गावांतील 74 रुग्णांचा समावेश आहे. तर 13 रुग्ण हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील तर 9 रुग्ण हे ग्रामीण भागातील आणि 9 रुग्ण हे इतर जिल्ह्यातील आहेत. राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे 121 रुग्णांचे शौच नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 21 नमुन्यांमध्ये नोरोव्हायरस हा विषाणूसंसर्ग आणि ५ नमुन्यांमध्ये कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणूसंसर्ग आढळला आहे.
नमुने पाठवले तपासणीसाठी

याचबरोबर 25 रुग्णांचे सेरेब्रोस्पायनल फ्लुईडचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात एका नमुन्यांमध्ये इपस्टीन बार विषाणूसंसर्ग आढळला आहे. तसेच, 200 रुग्णांच्या रक्त नमुन्यांमध्ये झिका, डेंग्यू आणि चिकुनगुन्या संसर्ग आढळून आलेला नाही, असे आरोग्य विभागाने नमूद केले आहे.

जीबीएस आजाराचे सर्वाधिक रुग्ण

शहरातील सिंहगड रोड, नांदेड सिटी परिसरात जीबीएस या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. हा आजार दूषित पाण्यामुळे पसरत असल्याची बाब समोर आली होती. या भागात असलेल्या विहिरीतून दूषित पाण्यामुळे या आजाराचा संसर्ग होत असल्याचे सांगितले जात होते. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत आज येथील भागात केंद्राचे ७ सदस्यांचे पथक पाहणी करण्यासाठी येथे आले होते. मात्र, गावातील नागरिकांनी त्यांच्या गाडीसमोर ठिय्या करत पाहणी करायला आला आहात आणि पाहणी न करताच चालला आहात असा आरोप केला. तसेच  अधिकाऱ्यांना गराडा घातला होता.

हेदेखील वाचा : पहिल्याच बैठकीत पालकमंत्री गोरेंचा धडाका; आरोग्य अन् क्रीडाधिकारी रडारवर, एसटी विभाग नियंत्रकांना नोटीस बजावण्याचे आदेश

Web Title: No new gbs patient in pune information from the health department nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 11:28 AM

Topics:  

  • Guillain Barre syndrome
  • pune news

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
2

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
3

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…
4

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.