मुंबई – खा. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त (Birthday) ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशभरातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे होणार प्रकाशन देखील करण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी केंद्रातील भाजपावर तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर (shinde fadnavis government) टिकास्त्र सोडेल.
दरम्यान, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करत टिका केली. सध्या देशात दाढीवाल्या लोकांच राज्य व सत्ता आहे. केंद्रात सत्तेत दाढीवाले आहेत, तसेच राज्यात सुद्धा दाढीवाल्या लोकांचं राज्य आहे, असं भुजबळांनी म्हणत केंद्रातील मोदी सरकारवर आणि राज्यातील शिंदे सरकारवर टिका केली. दरम्यान, यावेळी अजितदादांनी (ajit pawar) आपल्या भाषणात फटकेबाजी करत राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळचा किस्सा सांगितला. १९९९ साली वेळेत निवडणुका झाल्या असता तर…भुजबळ मुख्यमंत्री झाले असते, असं अजित पवार म्हणाले.