Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhagan Bhujbal News: छगन भुजबळांची रणनीती ठरली? ‘त्या’ बैठकीनंतर घेणार मोठा निर्णय

“नव्या मंत्रिमंडळाचे काल खातेवाटप झाले. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या होणाऱ्या पहिला बैठकीत, आम्ही जातीय जनगणना करण्याचा ठराव मंजूर करण्यात यावा, अशी मागणी करणार आहोत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 22, 2024 | 03:40 PM
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; छगन भुजबळ मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; छगन भुजबळ मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला

Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात  अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळण्यात आले. त्यामुळे त्यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य करत त्यांनी  आपली भूमिका  मांडली. पण त्यानंतर त्यांच्या नाराजीचे राज्यभर पडसाद उमटू लागले. छगन भुजबळांनी राज्यभरातील समर्थकांचा मेळावा घेतला.मुंबईत छगन भुजबळांच्या नेतृत्त्वात ओबीसी समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. मुंबईतील महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षेतखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसींचे प्रश्न आणि छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून का डावलण्यात आले, याबाबतही चर्चा करण्यात आली. त्यामुळे आता छगन भुजबळ काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘हे युद्ध नव्हे क्रूरता!’, गाझात मुलांवर फेकले बॉम्ब; इस्त्रायलवर भडकले पोप फ्रान्सिस

या बैठकीपूर्वी माध्यमांशी  बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले की,  “महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. 17  ओबीसी नेते मंत्री झाले आहे.  पण चळवळीत पुढे येऊन लढणारे छगन भुजबळ यांनाच मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. सध्याच्या मंत्रिमंडळात असलेले नेते म्हणजे सारा गाव मामाचा पण एक नाही कामाचा अशी स्थिती आहे. पण आम्ही काहीही झालं तर भुजबळ यांच्या पाठिशी उभे राहणार आहेत. भुजबळ सत्तेत असतील किंवा नसतील, आम्ही त्यांच्यासोबत राहू.

“नव्या मंत्रिमंडळाचे काल खातेवाटप झाले. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या होणाऱ्या पहिला बैठकीत, आम्ही जातीय जनगणना करण्याचा ठराव मंजूर करण्यात यावा, अशी मागणी करणार आहोत. देवेंद्र फडणीस  मुख्यमंत्री झाल्याने आता ते झाल्याने अधिक आक्रमकतेने आंदोलन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही दबावाखाली राज्य सरकारकडून ओबीसींवर अन्याय होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. ओबीसी समाजाचे प्रश्न आणि छगन भुजबळांसाठी आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्याचीही आमची तयारी आहे. असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे.

मंदिरातून बाहेर येताना घंटा वाजवणे शुभ की अशुभ

दरम्यान, ओबीसी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर छगन भुजबळ पुन्हा एक महत्त्वाची  बैठक घेतील. त्यानंतर ते आपली पुढची भूमिका मांडतील अशी शक्यता आहे. पण छगन भुजबळांनी वेगळी भूमिका घेतल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महायुतील मोठा फटका बसू शकतो, त्यामुळे आता एकेक करून भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी आता महायुतीचे नेत्यांकडून पुढाकार घेण्यास सुरूवात झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना  स्थान न मिळाल्यामुळे  भुजबळांसह त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी आहे. छगन भुजबळांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली. त्यानंतर ते त्यांच्या नाशिकच्या मतदारसंघातही निघून गेले. कार्यकर्त्यांशी बोलून आपण आपली पुढची भूमिका घेऊ असं म्हणाले. संतप्त झालेल्या छगन भुजबळांनी पक्षातील तीन बड्या नेत्यांवर आरोप केले, मात्र राष्ट्रवादीचा एकही नेता भुजबळांची समजूत काढायला गेला नाही. तेव्हापासून, छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत एकाकी पडल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

 

Web Title: Obc leaders issue a telling warning to the ruling grand alliance over chhagan bhujbals inclusion in the cabinet nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 03:21 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • OBC Reservation

संबंधित बातम्या

लक्ष्मण हाके यांची वादग्रस्त वक्तव्याची व्हिडिओ व्हायरल? नेमकं सत्य काय? हाकेंनी केलं स्पष्ट
1

लक्ष्मण हाके यांची वादग्रस्त वक्तव्याची व्हिडिओ व्हायरल? नेमकं सत्य काय? हाकेंनी केलं स्पष्ट

Nashik News: नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद पेटणार; छगन भुजबळांच्या पालकमंत्रीपदाला सुहास कांदेंचा विरोध
2

Nashik News: नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद पेटणार; छगन भुजबळांच्या पालकमंत्रीपदाला सुहास कांदेंचा विरोध

“भुजबळ तेल लावलेले पैलवान तर गिरीश महाजन त्यांच्यासमोर बच्चे..; कुंभमेळ्याच्या श्रेयवादावरुन रंगलं राजकारण
3

“भुजबळ तेल लावलेले पैलवान तर गिरीश महाजन त्यांच्यासमोर बच्चे..; कुंभमेळ्याच्या श्रेयवादावरुन रंगलं राजकारण

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप
4

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.