फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: इस्त्रायलआणि हमास युद्ध अजूनही सुरु आहे. हे युद्ध थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. दरम्यान, इस्त्रायलने गाझामधे तीव्र हल्ले केले आहेत. यामुळे या हवाई हल्ल्यांवर पोप फ्रान्सिस यांनी कठोर शब्दात हल्ल्याचा निषेध करत तीव्र टीका केली आहे. त्यांनी या हल्ल्यांना युद्ध नसून क्रूरता असे संबोधले आहे. पोप यांनी म्हटले आहे की, या हल्ल्यांमध्ये लहान मुलांवर बॉम्बफेक करण्यात आली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि मानवतेला काळिमा फासणारी आहे.
गाझातील स्थितीवर पोप यांचे कठोर भाष्य
शुक्रवारी (20 डिसेंबर) इस्रायलने गाझामधील हवाई हल्ल्यांमध्ये 25 पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी घेतला, यामध्ये बऱ्याच लहान मुलांचा समावेश होता. या हल्ल्यामुळे अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. पोप फ्रान्सिस, हे सहसा अशा संघर्षांवर कमी बोलतात, त्यांनी गाझामधील स्थितीवर कठोर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय तज्ञांचे म्हणणे आहे की गाझामध्ये जे काही घडत आहे ते नरसंहाराचे स्वरूप दर्शवते.
इस्त्रायलचे प्रत्युत्तर
गाझामधील परिस्थितीबाबत पोपने व्यक्त केलेल्या या संवेदनशीलतेवर इस्रायलने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, इस्रायल फक्त स्वतःच्या नागरिकांच्या संरक्षणासाठी आणि हमासच्या दहशतवाद्यांशी लढण्यासाठी प्रयत्नशील आहे. मंत्रालयाने असा दावा केला की, हमास इस्रायली मुलांना मारण्याचा प्रयत्न करत आहे आणि पॅलेस्टिनी नागरिकांना ओलीस ठेवून त्यांचा गैरवापर करत आहे.
पोप यांनी इस्त्रायलच्या दाव्याला खोटे म्हटले
इस्रायलने गाझामधील हल्ल्यात निष्पाप नागरिकांच्या जीविताची हानी टाळण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. परंतु, पोप फ्रान्सिस यांनी या दाव्यांना छेद देत इस्रायलच्या कारवायांना क्रूर ठरवले आहे. पोपच्या यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारची हिंसा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह ठरू शकत नाहीत.
युद्धाला एक वर्ष पूर्ण
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र बनत चालला आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर मोठा हल्ला केला होत. या हल्ल्यात 1200 लोक मारले गेले आणि 250 जणांना ओलिस ठेवण्यात आले होते. या हल्ल्यानंतर इस्रायलने पलटवार करत गाझामधील हमासला नष्ट करण्याची धमकी दिली होती. मात्र, या संघर्षात आतापर्यंत 45,0000 हून अधिक लोकांचे प्राण गेले आहेत आणि हजारो लोक गंभीर जखमी झाले आहेत.
या युद्धाचा शेवट कधी होईल, याबद्दल अनिश्चितता कायम आहे. गाझामधील युद्धाने दोन्ही बाजूंना प्रचंड नुकसान पोहोचवले आहे. या हिंसाचारावर आंतरराष्ट्रीय समुदायानेही चिंता व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत या संघर्षाचा तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी शांततेचा मार्ग स्वीकारणे गरजेचे आहे.