महाकुंभमेळा रेल्वेला पावला! कुंभच्या निमित्ताने रेल्वेच्या पुणे विभागाला 8.42 कोटी रुपयांचे उत्पन्न
कुंभ मेळ्यामुळे रेल्वेला मोठा फायदा झाला आहे. महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने रेल्वेच्या पुणे विभागाला तब्बल ८.४२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे.
पुणे : उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभमेळा पार पडला. 144 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याला कोट्यवधी लोकांनी सहभाग घेतला. देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रयागराजमध्ये लोकांनी सामील होऊन गंगेमध्ये स्नान केले. मध्यंतरी झालेल्या प्रयागराज कुंभ मेळ्यामुळे रेल्वेला मोठा फायदा झाला आहे. प्रवासासाठी भाविकांनी रेल्वेचा मोठ्या प्रमाणात वापर केला. महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने रेल्वेच्या पुणे विभागाला तब्बल
८.४२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.
रेल्वेच्या पुणे विभागातून एक दैनिक ट्रेन, पाच साप्ताहिक गाड्या आणि एक विशेष ट्रेन अशी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे या विभागाच्या महसुलात लक्षणीय वाढ झाली. १३ जानेवारी रोजी सुरू झालेला महाकुंभ २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरू होता. १२ फेब्रुवारी रोजीच्या माघी पौर्णिमेमुळे, पवित्र स्नानासाठी प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली. पुणे परिसरातुनच जानेवारी महिन्यातच ८०,१७७ यात्रेकरू प्रयागराजला पोहोचले. त्यातून रेल्वे तिकिटांच्या प्रचंड मागणीमुळे अनेक मार्गांवर २०० हून अधिक प्रवाशांची प्रतीक्षा यादी तयार झाली होती. कुंभमेळा समाप्ती पर्यंत ८०,००० हून अधिक भाविकांनी महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजकडे प्रवास केला. एका रेकमध्ये प्रति ट्रिप अंदाजे ३,७८० प्रवाशांसाठी सेवा उपलब्ध करण्यात आली.
भारतीय रेल्वेकडून फाफामऊ, नैनी, प्रयागराज, प्रयागराज संगम, सुभेदारगंज, प्रयागराज छेओकी, प्रयागराज रामबाग आणि झुंसी स्थानकांवर चांगली व्यवस्था करण्यात आली. वाढीव सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अतिरिक्त आरपीएफ जवानांच्या आणि टीटीई कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली होती. त्यामुळे हे संचालन नीट करता आले.
भाविकांना गैरसोयीशिवाय प्रवास करता यावा यासाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या होत्या. गर्दीच्या वेळी कार्यक्षम सेवा प्रदान करण्यावर आम्ही लक्ष दिले तसेच माघी पौर्णिमा हा कुंभातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक असल्याने भाविकांची संख्या जास्त होती, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अयोध्येतील राम मंदिराला बॉम्बस्फोटाची धमकी
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाची देखरेख करणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली, त्यानंतर सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आला. अधिकाऱ्यांनी एफआयआर नोंदवला आहे आणि या निनावी धमकीची चौकशी सुरू केली आहे, ज्यामुळे मंदिर परिसर आणि त्यातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. धमकीचा मेल मिळाल्यानंतर, मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवण्यात आली आणि अयोध्यासह बाराबंकी आणि चंदौलीसह इतर अनेक जिल्ह्यांमध्येही धमकीचे मेल आले. बाराबंकी आणि चंदौलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आला. अयोध्या आणि इतर जिल्ह्यांमध्ये आलेला धमकीचा मेल तामिळनाडूहून आला होता. एफआयआर नोंदवल्यानंतर, सायबर सेल पाठवलेल्या मेलची चौकशी करत आहे.
https://youtu.be/oXXqBx46A_0?si=84LcZQdpNNA7qgKa
Web Title: Occasion of mahakumbh mela pune division of railways earned income rs 842 crore