फोटो सौजन्य: istock
श्रीवर्धन/भारत चोगले:आपल्याकडे आजही शासकीय काम लवकर होणार नाही असा अनेकांचा विश्वास असतो. याचे कारण म्हणजे शासकीय काम पूर्ण होण्यासाठी मिळणाऱ्या तारखांवर तारखा. त्यातही जर तुमचे काम झटपट व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर मग काही वेळा चिरीमिरी सुद्धा द्यावी लागते. आजही अशा अनेक घटना घडत आहेत, जिथे सरकारी कर्मचारी सामान्य लोकांकडून त्यांचे काम पूर्ण होण्यासाठी चक्क लाच मागत आहेत. हे भ्रष्टाचाराचे प्रमाण केवळ वाढतच आहे, आणि त्याचाच प्रत्यय रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात आला. म्हणूनच तर 23 जानेवारी 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक सापळा रचला होता. चला याबद्दल जाणून घेऊया.
Purandar Airport: “जबरदस्ती केली तरी …”; पुरंदर विमानतळ प्रकल्पावरून शासनाला शेतकऱ्यांचा इशारा
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण लाचलुचपत प्रकरण उघडकीस आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 23 जानेवारी 2025 रोजी एक सापळा रचला, ज्यामध्ये बांधकाम विभागातील उप अभियंता डॉ. प्रवीण पंढरीनाथ मोरे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. मोरे यांनी एक खासगी कामासाठी सरकारी सेवक म्हणून लाच मागितली होती, ज्यामुळे त्यांना रंगेहाथ पकडले गेले. हा सापळा लाचलुचपतविरोधी कारवाईचा भाग होता, जो भ्रष्टाचाराशी लढा देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. ही घटना सरकारी अधिकाऱ्यांच्या कामकाजातील पारदर्शकतेला कसा धोका पोहचवते, हे स्पष्ट करते.
तक्रारदार यांना श्रीवर्धन तालुक्यातील एका सभागृहाच्या बांधकामासाठी 7,00,000 रुपयांचे कंत्राट 2023-24 या आर्थिक वर्षात मिळाले होते. काम पूर्ण झाल्यानंतर समाजकल्याण विभागाकडून 1,40,000 रुपयांचे बिल मंजूर झाले. परंतु, संबंधित कार्यकारी अभियंता कडून या बिलाची मंजूरी मिळवण्यासाठी आरोपी डॉ. प्रवीण मोरे यांनी तक्रारदाराकडून 13,000 रुपयांची लाच मागितली.
“जे बाळासाहेबांच्या विचारांचे मारक ते काय…”; शेरोशायरी करत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर डागले टीकेचे बाण
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात 22 जानेवारी 2025 रोजी तक्रार केली, ज्यावर तपास करून विभागाने तडजोडीअंती 10,000 रुपये लाच स्वीकारताना आरोपीला 23 जानेवारी 2025 रोजी रंगेहाथ पकडले. लाच स्वीकारताना आरोपीला पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सध्या सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे करित आहेत.
तसेच रायगड जिल्ह्यातील नागरिकांना हे आवाहन करण्यात आले आहे की, जर कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केली किंवा त्यांच्या वतीने एखाद्या एजंटने लाच मागितली, तर त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.