Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप रे! डॉमिनोज पिझ्झामध्ये सापडले काचेचे तुकडे

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 10, 2022 | 02:25 PM
बाप रे! डॉमिनोज पिझ्झामध्ये सापडले काचेचे तुकडे
Follow Us
Follow Us:

मुंबई : फास्टफूड मध्ये पिझ्झा हा अनेकांचा आवडता खाद्यपदार्थ आहे. लहान मुलांसह मोठ्यांपर्यंत सर्वचजण पिझ्झा हा आवडीने खातात. मात्र याच पिझ्झा संदर्भात मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत सुप्रसिद्ध पिझ्झा (pizza) ब्रँड डॉमिनोजच्या (dominos) पिझ्झामध्ये काचेचे तुकडे (pieces of glass) असल्याचा दावा एका ग्राहकाकडून करण्यात आला आहे. अरुण नावाच्या व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून काच आढळलेल्या पिझ्झाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पिझ्झाच्या आत काचेचे तुकडे दिसत असून पिझ्झा खात असताना हे काचेच्या काचेचे तुकडे सापडल्याचे अरुणने सांगितले. हा पिझ्झा त्याने डॉमिनोजकडून ऑर्डर केला होता.

2 to 3 pieces of glass found in @dominos_india This speaks volume about global brand food that we are getting @dominos @jagograhakjago @fssaiindia Not sure of ordering ever from Domino's @MumbaiPolice @timesofindia pic.twitter.com/Ir1r05pDQk — AK (@kolluri_arun) October 8, 2022

“डॉमिनोज पिझ्झामध्ये काचेचे २-३ तुकडे आहेत. ही जागतिक खाद्य ब्रँडची स्थिती आहे. मला माहित नाही की मी भविष्यात डॉमिनोजकडून काही ऑर्डर करेन की नाही,” असे अरुणने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.या ट्विटमध्ये अरुणने डॉमिनोजशिवाय मुंबई पोलिसांना (Mumbai Police) टॅग केले होते. मुंबई पोलिसांनी अरुणला आधी डॉमिनोजच्या  कस्टमर केअरसोबत बोलण्याचा सल्ला दिला. तेथूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करू शकतो, असे पोलिसांनी ट्विटवर दिलेल्या आपल्या उत्तरात म्हटलं आहे.

अरुणच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने त्याला विचारले की त्याच्या पिझ्झा (pizza) बॉक्ससोबत छेडछाड झाली आहे का? अरुणने सांगितले की पिझ्झा बॉक्स पूर्णपणे सील करण्यात आला होता. अरुणच्या म्हणण्यानुसार, त्याने हा पिझ्झा फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोवरुन (Zomato) ऑर्डर केला होता. अरुणने हे सांगितल्यानंतर त्याला झोमॅटोच्यावतीने ट्विटरवर उत्तर देण्यात आले. “असं घडायला नको होतं. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत आणि लवकरच तुम्हाला कळवू,” असे झोमॅटोने म्हटलं आहे.

डॉमिनोजच्या प्रतिनिधीने या प्रकरणावर एका माध्यमाशी बोलताना सांगितले की, “ही बाब समोर येताच कंपनीने ग्राहकांशी संपर्क साधला होता. “आमच्या प्रतिनिधींनी त्या रेस्टॉरंटची तपासणी सुरू केली आहे जिथून ग्राहकाने ऑर्डर दिली होती. तपासणीत काहीही आढळून आली नाही. स्वयंपाकघर आणि इतर कामाच्या ठिकाणी काच नसावी, असे आमचे कठोर धोरण आहे.”

आम्ही आमच्या किचनमध्ये काच न वापरण्याच्या कठोर धोरणाचे पालन करतो आणि गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या सर्वोच्च मानकांचे पालन करतो. तक्रारदाराकडून नमुने घेतल्यानंतर आम्ही या प्रकरणाची अधिक चौकशी करू आणि त्यानुसार कारवाई करू, असे डॉमिनोजने सांगितले.

Web Title: Oh my god glass shards found in dominos pizza

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2022 | 02:25 PM

Topics:  

  • DOMINOS

संबंधित बातम्या

झुरळे, उंदरांनी कुरतडलेले अन्न; डॉमिनोजच्या मुंबईतील ३ आउटलेट्सचे परवाने FDAने केले निलंबित
1

झुरळे, उंदरांनी कुरतडलेले अन्न; डॉमिनोजच्या मुंबईतील ३ आउटलेट्सचे परवाने FDAने केले निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.