Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झुरळे, उंदरांनी कुरतडलेले अन्न; डॉमिनोजच्या मुंबईतील ३ आउटलेट्सचे परवाने FDAने केले निलंबित

डॉमिनोजच्या पिझ्झाची चव घेणाऱ्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत मुंबईतील डॉमिनोजच्या तीन आउटलेट्समध्ये अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळले. त्यानंतर परळ, मरोळ आणि बोरिवलीतील या तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित करण्यात आले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 15, 2026 | 04:05 PM
झुरळे, उंदरांनी कुरतडलेले अन्न; डॉमिनोजच्या मुंबईतील ३ आउटलेट्सचे परवाने FDAने केले निलंबित

झुरळे, उंदरांनी कुरतडलेले अन्न; डॉमिनोजच्या मुंबईतील ३ आउटलेट्सचे परवाने FDAने केले निलंबित

Follow Us
Follow Us:
  • मुंबईतील १७ खाद्य आस्थापनांवर FDAची कारवाई
  • डॉमिनोजच्या परळ, मरोळ आणि बोरिवली आउटलेट्सचे परवाने निलंबित
  • झुरळे, उंदरांचा प्रादुर्भाव आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन
 

मुंबई : अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर आणि स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या प्रकारांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील १७ खाद्य आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्यात आली असून, त्यामध्ये डॉमिनोज पिझ्झाच्या तीन आउटलेट्सचा समावेश आहे. परळ, मरोळ-अंधेरी पूर्व आणि बोरिवली पश्चिम येथील डॉमिनोजच्या आउटलेट्सवर ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान कीटक आणि उंदरांचा प्रादुर्भाव, अन्न साठवणुकीतील त्रुटी, अस्वच्छ परिसर तसेच आवश्यक कागदपत्रे आणि नियमांचे पालन न केल्याचे FDAच्या कारवाईत समोर आले.

डॉमिनोजच्या ‘या’ तीन आउटलेट्सवर कारवाई

FDAच्या कारवाईत डॉमिनोजच्या तीन आउटलेट्सचा समावेश आहे.

  • परळ : रंगोली टाइम कॉम्प्लेक्स, डॉ. आंबेडकर रोड,
  • मरोळ, अंधेरी पूर्व : राज इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, मिलिटरी रोड
  • बोरिवली पश्चिम : निर्माण हाईट बिल्डिंग, लिंक रोड, डॉन बॉस्को स्कूलसमोर
ही आउटलेट्स Jubilant FoodWorks Ltd. मार्फत चालवली जातात.

हेही वाचा: Crime News: मामेबहिणीशी बोलल्याचा राग अनावर; आधी धमकी, नंतर चाकूने वार करून १९ वर्षीय तरुणाची हत्या

झुरळांचा प्रादुर्भाव, उंदरांनी कुरतडले अन्न

FDAच्या तपासणी आणि पुनर्तपासणीत विविध खाद्य आस्थापनांमध्ये गंभीर स्वच्छता आणि अन्नसुरक्षा त्रुटी आढळल्या. काही ठिकाणी झुरळे आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव आढळला, तर काही ठिकाणी उंदरांनी अन्नाची पाकिटे कुरतडल्याचे निदर्शनास आले. काही आस्थापनांमध्ये खराब अन्नपदार्थ, जळलेले किंवा अति वापरलेले तेल वापरले जात असल्याचेही आढळले. कच्चे आणि शिजवलेले अन्न योग्य पद्धतीने वेगळे न ठेवणे तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांच्या साठवणुकीत आवश्यक काळजी न घेतल्याचे FDAने नमूद केले आहे.

फ्रिजपासून फरशीपर्यंत अस्वच्छता

तपासणीदरम्यान काही ठिकाणी अस्वच्छ फरशी, अन्न हाताळण्याच्या ठिकाणी साचलेले पाणी, उघड्या कचरापेट्या आणि अस्वच्छ फ्रिज आढळले. काही आस्थापनांमध्ये फ्रिजचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक नोंदी आणि उपकरणांशी संबंधित देखभाल नोंदीही उपलब्ध नसल्याचे आढळले. अन्न तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक अप्रॉन, हेडगियर आणि इतर संरक्षणात्मक साधने नसल्याचेही तपासणीत समोर आले.

FSSAI परवाना आणि कागदपत्रांचेही उल्लंघन

FDAने केवळ स्वच्छतेपुरती कारवाई न करता अन्नसुरक्षा नियमांच्या पालनाचीही तपासणी केली. काही आस्थापनांनी FSSAI परवाना दर्शनी भागात लावलेला नव्हता. तसेच पेस्ट कंट्रोल अहवाल, अन्न हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र, खरेदी बिले आणि इतर आवश्यक नोंदी उपलब्ध नसल्याचे आढळले. काही ठिकाणी यापूर्वी FDAने दिलेल्या सुधारणा नोटिसीचे पालन करण्यात आले नसल्याचेही आढळले. त्यामुळे पुनर्तपासणीनंतर कठोर कारवाई करण्यात आली.

परळच्या डॉमिनोजमध्येही गंभीर त्रुटी

परळ येथील डॉमिनोजच्या आउटलेटची यापूर्वीही तपासणी करण्यात आली होती. सुधारणा नोटीस देऊनही त्रुटी दूर न केल्याने पुढील कारवाई करण्यात आली. पुनर्तपासणीत शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकाच डीप फ्रीजरमध्ये ठेवलेले आढळले. तसेच चिकन आणि पनीर तयार करण्यासाठी एकाच ओव्हन किंवा ग्रिलचा वापर होत असल्याचे FDAने नमूद केले.

मुंबईतील कारवाईबरोबरच FDAने राज्यातील विविध भागांतही अन्नसुरक्षेविरोधातील कारवाया केल्या. या कारवायांमध्ये २४,४०६ किलो संशयित निकृष्ट, असुरक्षित आणि चुकीचे लेबल असलेला अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे ५०.१९ लाख रुपये असल्याचे FDAने सांगितले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डॉमिनोजच्या किती आउटलेट्सवर कारवाई झाली?

    Ans: मुंबईतील डॉमिनोजच्या तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित करण्यात आले.

  • Que: मुंबईत एकूण किती आस्थापनांवर कारवाई झाली?

    Ans: मुंबईत एकूण किती आस्थापनांवर कारवाई झाली?

  • Que: राज्यभरातील कारवाईत किती अन्नसाठा जप्त झाला?

    Ans: FDAनुसार राज्यातील विविध कारवायांमध्ये २४,४०६ किलो संशयित निकृष्ट, असुरक्षित आणि चुकीचे लेबल असलेला अन्नसाठा जप्त करण्यात आला.

Web Title: Dominos mumbai fda action three outlets licence suspended sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • DOMINOS
  • FDA Action
  • food
  • Mumbai Crime case

संबंधित बातम्या

Food license suspended : बजरंग ट्रेडिंग कंपनीचा परवाना निलंबित, FDA ने छत्रपती संभाजीनगरमध्ये ₹ 23.35 लाख किमतीचे खाद्यतेल जप्त
1

Food license suspended : बजरंग ट्रेडिंग कंपनीचा परवाना निलंबित, FDA ने छत्रपती संभाजीनगरमध्ये ₹ 23.35 लाख किमतीचे खाद्यतेल जप्त

आता हवं तसं जेवण मिळणार थेट आकाशात! Akasa Air च्या नव्या In-Flight Menu ने जिंकलं प्रवाशांचे मन; पाहा काय आहेत खास मेन्यू
2

आता हवं तसं जेवण मिळणार थेट आकाशात! Akasa Air च्या नव्या In-Flight Menu ने जिंकलं प्रवाशांचे मन; पाहा काय आहेत खास मेन्यू

Maharashtra FDA Raid : अस्वच्छता आणि नियमभंग भोवला; मुंबईतील दहा आस्थापनांचे परवाने निलंबित
3

Maharashtra FDA Raid : अस्वच्छता आणि नियमभंग भोवला; मुंबईतील दहा आस्थापनांचे परवाने निलंबित

Sambhaji Nagar News : कप केकमध्ये प्लास्टिकचे तुकडे; रॉयल बेकर्सचा परवाना निलंबित, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
4

Sambhaji Nagar News : कप केकमध्ये प्लास्टिकचे तुकडे; रॉयल बेकर्सचा परवाना निलंबित, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.