Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gokul Dudh Sangh Election Result: सतेज पाटलांनी गोकुळचं रान हाणलं! महायुतीचा कंडका पडला, मुश्रीफांना पराभवाचा धक्का

Gokul Dudh Sangh Election Result:गोकुळची सूत्रे हाती असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आणि गोकुळचे माजी चेअरमन नावीद मुश्रीफ यांनाही पराभवाचा सामना करावा लागल्याने या निकालाची चर्चा अधिक रंगली आहे. या संपूर्ण लढतीत आमदार सतेज पाटील यांची रणनीती निर्णायक ठरल्याने तेच या निवडणुकीचे किंगमेकर ठरले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 19, 2026 | 05:47 PM
Gokul Dudh Sangh Election Result: सतेज पाटलांनी गोकुळचं रान हाणलं! महायुतीचा कंडका पडला, मुश्रीफांना पराभवाचा धक्का
Follow Us
Follow Us:
  • गोकुळ दूध संघ निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनेलचा २५ पैकी १४ जागांवर दणदणीत विजय
  • महायुतीची मोठी ताकद पणाला लागूनही महायुतीला मोठा राजकीय धक्का.
  • मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ निवडणुकीत पराभूत.
Gokul Dudh Sangh Election Result: पुरोगामी विचारांची परंपरा जपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीने राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतले होते. राज्यातील सत्ताधारी महायुतीचे तीन दिग्गज मंत्री, दोन खासदार आणि जिल्ह्यातील महायुतीचे आमदार एका बाजूला, तर काँग्रेसचे एकाकी आमदार सतेज पाटील दुसऱ्या बाजूला, असे चित्र या निवडणुकीत पाहायला मिळाले. मोठे राजकीय बळ, सत्तेची ताकद आणि नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या लढतीत ठरावधारक मतदारांनी दिलेल्या निकालामुळे महायुतीला मोठा राजकीय धक्का बसला.

विशेष म्हणजे, गोकुळची सूत्रे हाती असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आणि गोकुळचे माजी चेअरमन नावीद मुश्रीफ यांनाही पराभवाचा सामना करावा लागल्याने या निकालाची चर्चा अधिक रंगली आहे. या संपूर्ण लढतीत आमदार सतेज पाटील यांची रणनीती निर्णायक ठरल्याने तेच या निवडणुकीचे किंगमेकर ठरले आहेत.

Gokul Dudh Sangh Election Result: सतेज पाटलांचा गनिमी कावा, गोकुळच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची चर्चा 

महायुतीचे राजकीय बळ विरुद्ध सतेज पाटील

या निवडणुकीत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित ताकद उभी केली असताना सतेज पाटील यांनी विरोधकांची बाजू सांभाळत निवडणुकीत जोरदार लढत दिली. त्यामुळे ही निवडणूक केवळ दूध संघापुरती मर्यादित न राहता सत्ताधारी आणि विरोधकांमधील प्रतिष्ठेची लढाई बनली.

मुश्रीफांच्या चिरंजीवांच्या पराभवाने चर्चेला उधाण

गोकुळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ यांना पराभव पत्करावा लागल्याने महायुतीच्या गोटात या निकालाचे राजकीय अर्थ लावले जात आहेत. गोकुळच्या सत्ताकारणात प्रभाव असलेल्या नेतृत्वाला ठरावधारकांनी दिलेला हा कौल आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीची सर्वस्वी जबाबदारी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोपवली होती.

‘बिनआवाजाचा बॉम्ब’ ठरला चर्चेचा विषय

निवडणुकीच्या रणधुमाळीत सतेज पाटील यांनी केलेले ‘बिनआवाजाचा बॉम्ब फुटेल’ हे विधान पुन्हा आज चर्चेत आले. निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात आठवण काढली गेली. निवडणुकीत महायुतीच्या मोठ्या राजकीय ताकदीला आव्हान देत सतेज पाटील यांनी आपली रणनीती प्रभावी ठरविल्याचे त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

Gokul Milk Election: ‘गोकुळचे रंगा-बिल्ला’; कोल्हापुरच्या राजकारणात सोशल मीडियावर चिखलफेक!

दबावाच्या चर्चांमध्ये ठरावधारकांचा कौल महत्त्वाचा

निवडणुकीदरम्यान शपथा, गंडादोरे आणि देवतांच्या छायाचित्रांवर भंडारा लावून मतदानासाठी दबाव आणल्याच्या आरोपांचीही उघडपणे चर्चा झाली. अनेक कारभारी सभासदांनी या शपथा विरोधात उघडपणे आपली भूमिका मांडली. या पार्श्वभूमीवर ठरावधारकांनी दिलेला निकाल हा निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

गोकुळच्या राजकारणात नवे समीकरण?

या निकालामुळे गोकुळच्या सत्तासमीकरणांबाबत आता नव्याने गणीत मांडले जाईल . महायुतीच्या एकत्रित ताकदीसमोर सतेज पाटील यांनी दिलेली लढत आणि नावीद मुश्रीफ यांच्या सह जेष्ठ संचालकांचा झालेला पराभव यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण भविष्यात वेगळ्याच वळणावर जाऊ शकते.

Pradeep Purnekar Case : टायगर श्रॉफसाठी एकनाथ शिंदेंची तातडीची धाव, पण पूर्णेकरांना न्याय कधी?

चंद्रकांत दादांची हवा काढली

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गोकुळ मतदानानंतर प्रसारमाध्यमांना बोलताना प्रतिक्रिया दिली होती. गोकुळमध्ये २५ पैकी २५ जागा महायुती जिंकून येईल असे वक्तव्य केले होते. महायुतीच्या सर्वच नेत्यांनी धाडसी आत्मविश्वास दाखवून आम्हीच गोकुळचे सर्वेसर्वा आहोत असे सुचित केले होते. मात्र ठरावधारकांनी महायुतीच्या नेत्यांना जमिनीवर आणले असे या निकालावरून दिसून येते.

राजकीय प्रतिष्ठेची कसोटी

गोकुळची निवडणूक ही केवळ दूध संघाची लढाई न राहता राजकीय प्रतिष्ठेची कसोटी ठरली. महायुतीच्या नेत्यांची ताकद आणि सतेज पाटील यांची रणनीती यांच्यातील संघर्षात ठरावधारकांचा कौल निर्णायक ठरला. त्यामुळे या निवडणुकीनंतर कोल्हापूरच्या राजकारणात पुढे कोणती नवी समीकरणे आकाराला येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Okul dudh sangh election results satej patil panel wins 14 seats navid mushrif defeated as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • Gokul Milk

संबंधित बातम्या

Gokul Dudh Sangh Election Result: सतेज पाटलांचा गनिमी कावा, गोकुळच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची चर्चा 
1

Gokul Dudh Sangh Election Result: सतेज पाटलांचा गनिमी कावा, गोकुळच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची चर्चा 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.