
Chandrapur News, MLC Election 2026, Vidarbha Politics, Congress Vs BJP, Maharashtra Politics,
मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटनासाठी गेलेल्या काँग्रेसच्या 40 नगरसेवकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचे ‘टोकन’ही देण्यात आले आहे. हा आकडा तब्बल १५ लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यताही सुत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. पर्यटनासाठी गेलेल्या नगरसेवकांमध्ये सिंदेवाही नगरपंचायतीचे ४ नगरसेवक, नागभीड नगरपरिषदेचे 5, सावली नगरपंचायतीचे 5, तसेच, कोरपना, कुरखेडा आणि कोरची यासह इतरही काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींचा समावेश आहे.
मागील विधान परिषद निवडणुकीत भाजपकडे स्पष्ट बहुमत होते. असतानाही भाजपचे उमेदवार डॉ. रामदास आंबटकर यांना अगदी काठवरची मते मिळाली होती. यावेळी महायुतीकडे बहुमत असून ते विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. असे असतानाही त्यांना यावेळी कोणताही धोका पत्करायचा नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय भाजप आमदारावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.
चंद्रपूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील पक्षीय समीकरणांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या मतदारसंघात महापालिकांचे नगरसेवक, नगरपालिका सदस्य आणि नगरपंचायत सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. तिन्ही जिल्ह्यांमध्ये सध्या जिल्हा परिषदेची निर्वाचित बॉडी अस्तित्वात नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांवरच निवडणुकीची जबाबदारी असणार आहे. या मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या ९७७ इतकी आहे.
दरम्यान, या निवडणुकीसंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे नगरसेवक कुठे गेले, याच्याशी भारतीय जनता पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “काँग्रेसचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष कुठे गेले, याचा विचार त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनीच करावा. त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही,” असे बावनकुळे म्हणाले. तसेच, महायुती विधान परिषदेच्या सर्व १७ जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विधान परिषद निवडणूक बिनविरो
ध व्हावी, यासाठीही बावनकुळे यांनी सर्व पक्षांना आवाहन केले आहे. नागपूरमध्ये जवळपास ८०० पैकी ६०० मते भारतीय जनता पक्षाकडे असल्याचा दावा करत त्यांनी संख्याबळाचे महत्त्व अधोरेखित केले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इंधन वाचवा, पेट्रोल-डिझेल वाचवा’ असे आवाहन केले आहे. निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात प्रचारासाठी इंधनाचा वापर होतो. अनेक जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये फिरावे लागते. त्यामुळे जिथे संख्याबळ स्पष्ट आहे, तिथे निवडणुका बिनविरोध व्हाव्यात,” असे त्यांनी म्हटले. यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही विनंती केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.