फोटो सौजन्य- सोशल मीडिया
UPSC Recruitment 2026: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी खुशखबरी दिली आहे. यूपीएससीने ६४४ रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची अधिकृत नोटिफिकेशन जारी केली आहे.
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ६४४ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार शास्त्रज्ञ (सायंटिस्ट), व्यवस्थापक (मॅनेजर), वैज्ञानिक अधिकारी, व्याख्याता (लेक्चरर), सहाय्यक प्राध्यापक, सहाय्य्क कार्यकारी अभियंता, उपसंचालक, संशोधन अधिकारी, सहाय्यक नियंत्रक आणि उपनियंत्रक या पदांचा समावेश आहे.
तसेच या भरतीअंतर्गत कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, संयुक्त सहाय्यक संचालक, पर्यटन अधिकारी, संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा(CDS), मानववंशशास्त्रज्ञ अशा अनेक पदांकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेद्वार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
विशेष म्हणचे या भरतीपूर्वी यूपीएससीने ३९४ पदांसाठी अर्ज मागवले होते. त्यामध्ये पुरषांसाठी ३७० आणि महिलांसाठी २४ जागांचा समावेश होत्या. या जागा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी म्हणजेच एनडीए (NDA) आणि भारतीय नौदल प्रबोधनी म्हणजेच आयएनए (INA १०+२ कॅडेट प्रवेश योजना – २४ जागा) यांच्याशी संबंधित होत्या.
या सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ जून निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेद्वारांनी आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ठरवून दिलेल्या अंतिम तारखेला संध्याकाळी ६ वाजेपूर्वी अर्ज सादर करावा.
यूपीएससीच्या या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेद्वारांपैकी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या(NDA) आर्मी विंगसाठी उमेद्वारांने १२ वी उत्तीर्ण किंवा राज्य शिक्षण मंडळ अथवा विद्यापीठाची समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
दुसरीकडे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या (NDA) वायुसेना आणि नौसेना विंगसाठी तसेच भारतीय नौदल प्रबोधनीच्या (INA) कॅडेट प्रवेशासाठी उमेद्वाराने भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry) आणि गणित (Mathematics) या विषयांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.






