Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

C. P. Radhakrishnan: “ऑपरेशन सद्भावना” लोकशाही बळकट करणारा उपक्रम; राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे महाराष्ट्राची संस्कृती तसेच येथील भौगोलिक माहिती मिळण्यास मदत होईल. नावीन्यपूर्ण उपक्रम आणि प्रवासाचा अनुभव या विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभराची शिदोरी म्हणून उपयोगी पडेल, असे राज्यपाल म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 23, 2025 | 02:35 AM
C. P. Radhakrishnan: “ऑपरेशन सद्भावना” लोकशाही बळकट करणारा उपक्रम; राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडच्या “ऑपरेशन सद्भावना” हा उपक्रम भारताच्या लोकशाही मूल्यांना बळकट करणारा आहे. या उपक्रमात सिक्कीम मधील युवक-युवतींच्या सक्रिय सहभागामुळे देशाच्या समावेशक आणि ऐक्यपूर्ण भविष्यासाठी नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

राजभवन येथे भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडच्या “ऑपरेशन सद्भावना” उपक्रमांतर्गत आयोजित नॅशनल इंटीग्रेशन टूर अंतर्गत सिक्कीम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी भेट दिली. मेजर सृजन सिंह नेगी, मेजर आरती रावत, सिक्कीम विद्यापीठाचे १५ विद्यार्थी आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल  राधाकृष्णन म्हणाले की, सिक्कीमधील विविध गावांतील विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी संवाद साधण्याचा हा विशेष योग माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आहे. मेजर सृजन सिंह नेगी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले पाहिजे. लष्कर केवळ देशाच्या संरक्षणाचे कार्य करत नाही तर राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक समृद्धीसाठी देखील सातत्याने काम करत आहे. देशाच्या विविध भागांतील तरुणांना एकमेकांच्या संस्कृतीशी जोडणाऱ्या या दौऱ्यामुळे सद्भावना, सांस्कृतिक आदान-प्रदान आणि एकतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होईल.

राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की, विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे महाराष्ट्राची संस्कृती तसेच येथील भौगोलिक माहिती मिळण्यास मदत होईल. नावीन्यपूर्ण उपक्रम आणि प्रवासाचा अनुभव या विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभराची शिदोरी म्हणून उपयोगी पडेल. विद्यार्थ्यांना संबोधित करताना राज्यपालांनी विविधतेतील एकतेचा संदेश दिला आणि त्यांच्या प्रवासातील अनुभवातून प्रेरणा घेऊन, एकता व सांस्कृतिक वारशाची माहिती या विद्यार्थ्यांना होणार आहे. राज्यपालांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भारतभूमीसाठी असलेल्या आपल्या सर्वांच्या कर्तव्य आणि जबाबदारी याबद्दल त्यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा अनुभव जाणून घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी राज्यपालांच्या प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तरे दिली.

मेजर सृजन सिंह नेगी यांनी यावेळी भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडच्या “ऑपरेशन सद्भावना” उपक्रमांतर्गत राज्यात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी दिलेल्या भेटीची माहिती दिली.

राजभवन मधील आदरातिथ्य पाहून विद्यार्थ्यी गेले भारावून

सिक्कीम विद्यापीठाचे लॅक्चूम लेक्चा, सोनम लेक्चा, लाका डोमा या विद्यार्थ्यांनी राज्यपालांशी केलेल्या संवादादरम्यान “आम्ही आयुष्यात प्रथमच विमान प्रवासाचा अनुभव घेतला आहे.मुंबई अनेकदा चित्रपटांमधून पाहिली होती. पण आज प्रत्यक्ष पाहताना ती खरोखरच भव्य आणि मनमोहक वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. उंच इमारती आणि प्रचंड लाटांचा समुद्र पाहून मन प्रसन्न झाले असल्याचे सांगितले.”या दौऱ्यात आम्हाला राज्यपालांकडून मिळालेले प्रेम, आतिथ्य आणि आपुलकी अत्यंत भावले असून याबद्दल आम्ही आमच्या आईवडील, शिक्षक आणि मित्रांना या अनुभवाबद्दल सांगणार आहोत.

सिक्कीमहून आलेल्या विद्यार्थ्यांची निवासव्यवस्था, संपूर्ण दौऱ्यात प्रत्येक सोयीसाठी विशेष लक्ष देण्यात आले.विद्यार्थ्यांनी एन.डी.ए.मधील प्रशिक्षण आणि शिस्तबद्धतेचा अनुभव घेतल्याचे सांगितले. मुंबईतील गिरगाव चौपाटी, अटल सेतू, गेट वे ऑफ इंडिया ही प्रेक्षणीय स्थळे त्यांनी पाहिली. तसेच मुंबईतील प्रसिद्ध बाजारात खरेदीचाही अनुभव घेतला.“मुंबई विषयी जे काही ऐकले होते, ते प्रत्यक्षात अनुभवता आले. राज्यपालांशी भेट घेण्याची संधी मिळाली, ही आमच्यासाठी अत्यंत गौरवाची गोष्ट आहे,” असे विद्यार्थ्यांनी सांगितले.महाराष्ट्रातील या दौऱ्यात खूप काही शिकता आले, राजभवन येथील भेटीचा हा अनुभव आमच्यासाठी अविस्मरणीय ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. “येथे शिकलेल्या गोष्टी भविष्यात देशसेवेच्या मार्गावर उपयोगी पडतील,” असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Operation sadbhavana initiative to strengthen democracy said maharashtra governor cp radhakrishnan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • C. P. Radhakrishnan
  • indian army
  • Mumbai News
  • rajbhavan

संबंधित बातम्या

दीड तासांचा प्रवास फक्त 10 मिनिटांत; मढ-वर्सोवा केबल पूल लवकरच सुरू होणार
1

दीड तासांचा प्रवास फक्त 10 मिनिटांत; मढ-वर्सोवा केबल पूल लवकरच सुरू होणार

‘एकलव्य’मध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी; अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५८३ जागांसाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन
2

‘एकलव्य’मध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी; अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५८३ जागांसाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी; आघाडी तुटली, काँग्रेस आता स्वबळावर
3

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी; आघाडी तुटली, काँग्रेस आता स्वबळावर

Thane-CSMT प्रवास सोपा होणार! सायन उड्डाणपुलाला समांतर दोन पदरी पूल उभारणार, कसा असेल मार्ग?
4

Thane-CSMT प्रवास सोपा होणार! सायन उड्डाणपुलाला समांतर दोन पदरी पूल उभारणार, कसा असेल मार्ग?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.