Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील RTE शाळांच्या संख्येत घट; तब्बल 771 शाळा झाल्या कमी

शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांना मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 05, 2026 | 11:11 AM
राज्यात 'आरटीई'च्या तब्बल ७७१ शाळा घटल्या

राज्यात 'आरटीई'च्या तब्बल ७७१ शाळा घटल्या

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात गेल्या पाच वर्षांत शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत नोंदणीकृत खासगी शाळांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून, तब्बल ७७१ शाळांनी आरटीई प्रक्रियेतून माघार घेतली आहे. वर्ष २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात राज्यात ९४३१ शाळांची ‘आरटीई’ अंतर्गत नोंदणी होती. मात्र, २०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी ही संख्या घटून ८,६६० इतकी राहिली आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांना मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. या कोट्यातील विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती शासनाकडून संबंधित शाळांना केली जाते; मात्र प्रतिपूर्ती उशिरा मिळणे, वाढते खर्च, प्रशासकीय अडचणी आदी विविध कारणांमुळे अनेक खासगी शाळा आरटीई प्रवेशप्रक्रियेतून अंग काढून घेत असल्याचे चित्र आहे. राज्यात २०२१-२२ मध्ये ९४३१ शाळांची नोंदणी असताना २०२५-२६ मध्ये ती संख्या ८८६३ वर आली आहे.

हेदेखील वाचा : Chh. Sambhaji Nagar : सहकार महर्षी माणिकराव पालोदकर विद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भावूक निरोप समारंभाचे आयोजन!

शाळांच्या घटत्या सहभागाची विविध कारणे आहेत. अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळांना शासनाकडून विविध सवलती मिळतात. या शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी बिंदू नामावली लागू नसते. तसेच आरटीईची नोंदणीही बंधनकारक राहत नाही. त्यामुळे अनेक खासगी शाळा अल्पसंख्यांक दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे. एकदा अल्पसंख्यांक दर्जा मिळाल्यानंतर संबंधित शाळा आपोआपच आरटीई नोंदणी प्रक्रियेतून बाहेर पडतात, त्यामुळे आरटीईअंतर्गत शाळांची संख्या घटत असल्याचे बोलले जात आहे.

शासनाच्या अभियानास मिळतोय प्रतिसाद

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या स्पर्धात्मक अभियानास दोन वर्षात मोठा प्रतिसाद लाभला आहे. २०२५-२६ मध्ये हे अभियान राबविण्यासाठी ८६.७३ कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून, सुधारित निकष आणि नवीन उपक्रमांसह या अभियानाचा तिसरा टप्पा राबविण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली.

हेदेखील वाचा : Mumbai News : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धात्मक अभियान ; मोहिमेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद जारी

Web Title: 771 number of rte schools in maharashtra decreased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • Mumbai News
  • School Education

संबंधित बातम्या

व्यावसायिक चालकांना मराठी बंधनकारक! १६ ऑगस्ट २०२६ पासून अंमलबजावणी होणार; कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी
1

व्यावसायिक चालकांना मराठी बंधनकारक! १६ ऑगस्ट २०२६ पासून अंमलबजावणी होणार; कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी

Maharashtra Breaking News Updates Today: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार टाकणार मोठा डाव?
2

Maharashtra Breaking News Updates Today: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार टाकणार मोठा डाव?

MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत आंदोलन; बेलापूर मुख्यालयाबाहेर साखळी उपोषणाला सुरुवात
3

MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत आंदोलन; बेलापूर मुख्यालयाबाहेर साखळी उपोषणाला सुरुवात

मुंबईसाठी सरकारचा मेगा मास्टर प्लॅन! 13 हजार कोटींचा पूरनियंत्रण आराखडा, 825 अब्ज डॉलर जीडीपीचे लक्ष्य; फडणवीसांची मोठी घोषणा
4

मुंबईसाठी सरकारचा मेगा मास्टर प्लॅन! 13 हजार कोटींचा पूरनियंत्रण आराखडा, 825 अब्ज डॉलर जीडीपीचे लक्ष्य; फडणवीसांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.