मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळं (Flood) काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या (rainy season ) चौथ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी (MVA MLA) विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे सरकारच्या (Shinde government) विरोधात जोरदार निदर्शने केली. दरम्यान, ओला दुष्काळ जाहीर करा… अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत करा… पन्नास खोके, एकदम ओके… ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी… स्थगिती सरकार हाय हाय… आले रे आले गद्दार आले… अश्या घोषणा देत आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर सरकारविरोधात (State government) जोरदार निदर्शने केली.
[read_also content=”पूरग्रस्तांना, शेतकऱ्यांना मदत करण्यास राज्य सरकार अपयशी, अजित पवार यांची राज्य सरकारवर टिका https://www.navarashtra.com/maharashtra/failure-state-government-to-farmer-help-ajit-pawar-318805.html”]
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस असून महाविकास आघाडीमधील सर्व आमदारांनी ईडी सरकारविरोधात आंदोलन करत सरकारला धारेवर धरण्याचे काम केले. या प्रश्नी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुद्धा आवाज उठविला.