Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Boisar च्या नव्या Railway Goods Yard चा मार्ग मोकळा; केंद्र सरकारकडून वनजमिनीच्या हस्तांतरणाला अंतिम मंजुरी!

Boisar Railway Goods Yard Approval : तारापूर औद्योगिक वसाहत आणि विरार-डहाणू रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणासाठी महत्त्वाच्या असलेल्या बोईसरच्या नव्या गुड्स यार्ड प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ४.९८५ हेक्टर वनजमीन मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यास अंतिम मंजुरी दिली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 19, 2026 | 10:02 AM
Boisar च्या नव्या Railway Goods Yard चा मार्ग मोकळा ( सौजन्य - सोशल मीडिया )

Boisar च्या नव्या Railway Goods Yard चा मार्ग मोकळा ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Boisar च्या नव्या Railway Goods Yard चा मार्ग मोकळा
  • केंद्र सरकारकडून वनजमिनीच्या हस्तांतरणाला अंतिम मंजुरी!
  • वाहतूक व्यवस्थेला मिळू शकणार दिलासा
Boisar Railway Goods Yard Approval : तारापूर औद्योगिक वसाहतीतील वाढती मालवाहतूक आणि विरार-डहाणू रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या ठरणाऱ्या बोईसरच्या प्रस्तावित नवीन गुड् यार्डच्या कामाला आता आणखी वेग मिळणार आहे. बोईसर-काटकर पाडा परिसरातील रेल्वे यार्डसाठी आवश्यक असलेल्या ४.९८५ हेक्टर वनजमिनीच्या हस्तांतरणास केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने अंतिम मंजुरी दिली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडे ही वनजमीन हस्तांतरित करण्यात येणार असून, वनजमिनीचा प्रश्न मार्गी लागल्याने प्रकल्पातील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. नवीन यार्डचे बांधकाम यापूर्वीच सुरू असून, या प्रकल्पासाठी वनजमिनीव्यतिरिक्त सुमारे ७.७ हेक्टर बिगर-वन व खासगी जमिनीचा वापर करण्यात येणार आहे. ( Boisar Railway Goods Yard Approval ) 

Vasai Ganeshotsav News : विसर्जन व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह; किनाऱ्यावर गणेशमूर्तींची विटंबना, पालिका- पोलिसांची धावपळ

तारापूर एमआयडीसीतील स्टील, रासायनिक, कापड व अन्य उद्योगांमधून होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील मालवाहतुकीसाठी हे यार्ड महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या बोईसर पश्चिमेकडील गुड् यार्ड विरार-डहाणू मार्गाच्या तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकच्या कामात अडथळा ठरत असल्याने ते काटकर पाडा परिसरातील नव्या ठिकाणी हलविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्याचे गुड्यार्ड स्थलांतरित झाल्यानंतर विरार-डहाणू रेल्वे मार्गावरील अतिरिक्त दोन मार्गिका टाकण्याच्या कामाला अधिक मोकळीक मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात उपनगरी, मालवाहतूक रेल्वे सेवांची क्षमता वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

वाहतूक व्यवस्थेला मिळू शकणार दिलासा

नवीन यार्ड कार्यान्वित झाल्यानंतर तारापूर एमआयडीसीकडून येणारी अवजड मालवाहतूक नियोजित मार्गाने यार्डकडे वळवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे बिरसा मुंडा चौक व बोईसर-पालघर मार्गावरील अवजड वाहनांचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. चित्रालय परिसरातील नव्या यार्डमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेलाही काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

अवजड वाहतुकीवरील भार कमी होणार

तारापूर एमआयडीसीबरोबरच प्रस्तावित वाढवण बंदराच्या पार्श्वभूमीवर बोईसरमध्ये आधुनिक आणि मोठ्या क्षमतेचे गुड़ यार्ड उभारणे महत्त्वाचे मानले जात आहे. औद्योगिक मालाची रेल्वेमार्गे वाहतूक वाढल्यास रस्त्यावरील अवजड वाहतुकीचा भार कमी करण्यासही याचा उपयोग होऊ शकतो. वनजमिनीच्या हस्तांतरणाच्या बदल्यात पालघर जिल्ह्यातील सुमारे १० हेक्टर क्षेत्रावर पूरक वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी वनजमिनीचा वापर करताना पर्यावरणीय भरपाईची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय! 6 फुटांपर्यंतच्या POP Ganpati Visarjan कृत्रिम तलावातच; मोठ्या मूर्तींना सशर्त मुभा

Web Title: Boisar new railway goods yard forest land approval virar dahanu marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • Boisar
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Virar Illegal Construction Scam : बनावट परवानग्यांवर अनधिकृत इमारतींचा गोरखधंदा; महारेरा नोंदणीशिवाय सदनिकांची विक्री, दस्तनोंदणी!
1

Virar Illegal Construction Scam : बनावट परवानग्यांवर अनधिकृत इमारतींचा गोरखधंदा; महारेरा नोंदणीशिवाय सदनिकांची विक्री, दस्तनोंदणी!

Vasai Virar Heavy Rain : बाप्पाच्या स्वागताला पावसाचे विघ्न! वसई-विरारमध्ये गुडघाभर पाणी; पुढील काही दिवस…
2

Vasai Virar Heavy Rain : बाप्पाच्या स्वागताला पावसाचे विघ्न! वसई-विरारमध्ये गुडघाभर पाणी; पुढील काही दिवस…

Vasai Virar Bus Strike : गणेशोत्सवातच बस सेवा ठप्प! वसई-विरारच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; हजारो प्रवाशांचे हाल
3

Vasai Virar Bus Strike : गणेशोत्सवातच बस सेवा ठप्प! वसई-विरारच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; हजारो प्रवाशांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.