
मुदतबाह्य औषध प्रकरणाचा चौकशी अहवालच गायब ( सौजन्य - सोशल मीडिया )
मे २०२६ मध्ये भाजप नगरसेवकांनी सर डी. एम. पेटीट रुग्णालयात अचानक पाहणी केली असता, तेथे मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य (एक्स्पायरी) औषधांचा साठा उघड झाला होता. या गैरप्रकारामुळे आरोग्य वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणात नेमकी काय कारवाई झाली, समितीने काय निष्कर्ष काढले आणि कोणावर जबाबदारी निश्चित केली, याची माहिती मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कुमार काकडे यांनी माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला होता.
या अर्जाला देताना जन अधिकारी तथा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी दिलेला खुलासा अत्यंत धक्कादायक आहे. मुदतबाह्य औषध प्रकरणातील चौकशी अहवाल व कारवाईचे कोणतेही दस्तावेज वैद्यकीय आरोग्य विभागाच्या अभिलेख कक्षात (रेकॉर्ड रूम) उपलब्ध नसल्याचे त्यांनी अधिकृत पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची नेमकी चौकशी झाली तरी कुठे, दोषींना वाचवण्यासाठी रेकॉर्ड नष्ट करण्यात आले का आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना महापालिकेत कोणाचे अभय आहे, असे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या गंभीर गैरप्रकाराची दखल घेत कुमार काकडे यांनी महापालिका आयुक्त, महापौर आणि अन्न व औषध प्रशासन (एफडीए) मंत्र्यांकडे लेखी दाद मागितली आहे. रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि शासकीय नोंदी गायब करणाऱ्या जबाबदार आरोग्य अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे (एफआयआर) दाखल करण्याची मागणी काकडे यांनी केली आहे. या प्रकरणावर पालिका आयुक्त काय भूमिका घेतात आणि औषध घोटाळ्यातील बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण वसई-विरारकरांचे लक्ष लागले आहे.
सर डी. एम. पेटीट रुग्णालयातील औषध घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने प्रत्यक्ष औषध भांडाराची पाहणी केली असता महापालिकेचा धक्कादायक निष्काळजीपणा समोर आला होता.
तपासणी दरम्यान वापरात असलेली औषधे आणि मुदत संपलेली औषधे एकाच जागी अस्ताव्यस्त साठवून ठेवल्याचे उघड झाले. समितीला तब्बल १० वेगवेगळ्या प्रकारची औषधे कालबाहा झाल्याचे आढळले. औषध साठ्याचे योग्य वर्गीकरण न केल्यामुळेच हा सावळा गोंधळ निर्माण झाल्याचे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Ans: मे २०२६ मध्ये भाजप नगरसेवकांनी अचानक केलेल्या पाहणीदरम्यान रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य औषधांचा साठा उघड झाला होता.
Ans: वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या खुलाशानुसार, या प्रकरणातील चौकशी अहवाल व कारवाईचे कोणतेही दस्तावेज रेकॉर्ड रूममध्ये उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Ans: महापालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती नेमली होती, जिने औषध भांडारात १० वेगवेगळ्या प्रकारची मुदतबाह्य औषधे असल्याचे शोधून काढले होते.