Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Illegal Firecracker Factory : विरारमध्ये बेकायदेशीर फटाका कारखान्यावर पोलिसांचा छापा! 3 जणांवर गुन्हा; 13 लाखांचा साठा जप्त

Illegal Firecracker Factory : विरार पूर्वेकडील चंदनसार रस्ता परिसरातील गजबजलेल्या नागरी वस्तीत बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या फटाका कारखान्यावर गुन्हे प्रकटीकरण कक्ष-२ च्या पथकाने गुरुवारी छापा टाकला. या कारवाईत १२ लाख ९८ हजार ५५० रुपयांचा स्फोटक साठा व रसायने जप्त करण्यात आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 07, 2026 | 07:48 PM
विरारमध्ये बेकायदेशीर फटाका कारखान्यावर पोलिसांचा छापा! ( सौजन्य - Chatgpt )

विरारमध्ये बेकायदेशीर फटाका कारखान्यावर पोलिसांचा छापा! ( सौजन्य - Chatgpt )

Follow Us
Follow Us:
  • तिघांवर गुन्हा, १७ कामगार ताब्यात
  • रसायनासह १३ लाखांचा साठा जप्त
  • नागरी वस्तीत बेकायदेशीर फटाका कारखाना
Illegal Firecracker Factory : विरार पूर्वेकडील गजबजलेल्या परिसरातील दाट नागरी वस्तीत बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या एका अनधिकृत फटाका कारखान्यावर गुन्हे प्रकटीकरण कक्ष-२ च्या पथकाने गुरुवारी सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत स्फोटक रसायने आणि कच्च्या मालासह १२ लाख ९८ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे. ( Illegal Firecracker Factory ) 

Aadhar Housing Finance : घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! आधार हाऊसिंग फायनान्सचा नफा 308 कोटींवर; क्रेडिट रेटिंगमध्येही सुधारणा

चंदनसार रस्त्यावरील ‘जी. एम. बेव्हरेज’ कंपनीच्या शेजारी ‘मर्चट एंटरप्रायझेस’ नावाचे फटाक्यांचे दुकान आहे. या दुकानाच्या इमारतीमधील वरच्या दोन मजल्यांवर कोणत्याही शासकीय परवान्याशिवाय व अग्निसुरक्षा नियमांची पायमल्ली करून अत्यंत धोकादायक पद्धतीने फटाक्यांचे उत्पादन सुरू होते. हे तयार फटाके थेट तळमजल्यावरील दुकानातून बाजारात विकले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास छापा टाकून हा गोरखधंदा उघडकीस आणला.

एटीएसमार्फत सखोल चौकशी करा : राजन सिंह

नियमांनुसार फटाक्यांचे कारखाने मानवी वस्तीपासून सुरक्षित अंतरावर असणे बंधनकारक असते. या कारखान्यात किंचितही निष्काळजीपणामुळे ठिणगी पडली असती, तर प्रचंड स्फोट होऊन शेकडो निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात आला असता. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य पाहता फटाके निर्मितीसाठी वापरण्यात आलेली घातक रसायने, कच्च्या मालाचा पुरवठा, त्यामागील आर्थिक व्यवहार आणि आंतरजिल्हा नेटवर्क उघडकीस आणण्यासाठी मुंबई दहशतवादविरोधी पथकाकडून सखोल चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी राजन सिंह यांनी केली आहे.

नामांकित ब्रँडचा केला गैरवापर

कारखान्यात तब्बल १७ कामगार अत्यंत असुरक्षित वातावरणात स्फोटक रसायने हाताळताना आढळून आले. येथे नामांकित बँडच्या नावाचा गैरवापर करून बनावट फटाके तयार केले जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. याशिवाय या धोकादायक कामात अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात आला होता का, याचाही पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी सुलतान मासुमअली मर्चेंट (वय ६५), सागर सुरेश पाष्टे (वय ३९) आणि देवेंद्र अजय नाईक यांच्याविरोधात विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

US Election Impact Elon Musk : अमेरिकन निवडणुका मस्क यांच्या अंगलट? काही दिवसांत 10 लाख कोटींचं नुकसान, चौकशीचीही टांगती तलवार

💡

Frequently Asked Questions

  • Que: विरार पोलिसांनी छापा टाकलेला अनधिकृत फटाका कारखाना कुठे सुरू होता?

    Ans: विरार पूर्वेकडील चंदनसार रस्त्यावरील 'जी. एम. बेव्हरेज' कंपनीच्या शेजारी असलेल्या 'मर्चंट एंटरप्रायझेस' नावाच्या दुकानाच्या इमारतीमधील वरच्या दोन मजल्यांवर हा कारखाना परवान्याशिवाय चालवला जात होता.

  • Que: कारवाईत पोलिसांनी किती रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि किती जणांवर गुन्हा दाखल झाला?

    Ans: कारवाईत १२ लाख ९८ हजार ५५० रुपयांची रसायने व कच्चा माल जप्त करण्यात आला असून, सुलतान मर्चेंट, सागर पाष्टे आणि देवेंद्र नाईक या तिघांवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

  • Que: प्रकरणाची कोणत्या पथकाकडून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे?

    Ans: घातक रसायने, कच्च्या मालाचा पुरवठा आणि आंतरजिल्हा नेटवर्कचा शोध घेण्यासाठी मुंबई दहशतवादविरोधी पथकाकडून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी राजन सिंह यांनी केली आहे.

Web Title: Illegal firecracker factory raided virar 13 lakh property seized marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 07:48 PM

Topics:  

  • Firecracker
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Vasai Virar News : वसई-विरारमध्ये खळबळ! मुदतबाह्य औषध प्रकरणाचा चौकशी अहवालच गायब; प्रकरण दडपण्याचा गंभीर आरोप
1

Vasai Virar News : वसई-विरारमध्ये खळबळ! मुदतबाह्य औषध प्रकरणाचा चौकशी अहवालच गायब; प्रकरण दडपण्याचा गंभीर आरोप

Vasai Fashion Viral : पॅरिस फॅशन वीकला टक्कर? वसईत दिसली हटके देसी फॅशन शो, सोशल मीडियावर चर्चा
2

Vasai Fashion Viral : पॅरिस फॅशन वीकला टक्कर? वसईत दिसली हटके देसी फॅशन शो, सोशल मीडियावर चर्चा

Mira-Bhayandar News: मीरा-भाईंदरमध्ये नियम धाब्यावर; निवासी आणि गर्दीच्या ठिकाणी फटाके विक्रीचे स्टॉल
3

Mira-Bhayandar News: मीरा-भाईंदरमध्ये नियम धाब्यावर; निवासी आणि गर्दीच्या ठिकाणी फटाके विक्रीचे स्टॉल

Vasai Viral Video : वसई रोड रेल्वे स्थानकावर मध्यरात्री राडा, प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील व्हिडिओ व्हायरल
4

Vasai Viral Video : वसई रोड रेल्वे स्थानकावर मध्यरात्री राडा, प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.