Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dahanu Road : खासदार-आमदारांचे ऐकेना प्रशासन? 2 वर्षांपासून रस्त्याची वाट लागल्याने डहाणूत नागरिक रस्त्यावर

Dahanu Road : डहाणू तालुक्यातील वाघाडी-दह्याळे-कांदरवाडी-ओसरविरा मार्गाची गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांनी अॅड. विराज गडग यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले. खासदार डॉ. हेमंत सवरा आणि आमदार राजेंद्र गावित यांच्या सूचनेनंतरही कारवाई नाही.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 10, 2026 | 10:58 AM
( सौजन्य - सोशल मीडिया )

( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • ५ गावांतील नागरिकांचा धोकादायक प्रवास!
  • खासदार-आमदारांच्या सूचनेनंतरही प्रशासन ढिम्म!
  • प्रशासनाला धरले धारेवर
Dahanu Road : डहाणू तालुक्यातील वाघाडी-दह्याळे-कांदरवाडी-ओसरविरा मार्गाच्या दुरवस्थेवरून अॅड. विराज गडग यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी बुधवारी (दि. ०९) रास्ता आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला. खासदार डॉ. हेमंत सवरा आणि आमदार राजेंद्र गावित यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना करूनही जिल्हा प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या सूचनांनाही प्रशासन जुमानत नसल्याचे चित्र निर्माण झाले असून, लोकप्रतिनिधींची भूमिका प्रशासनापुढे कमी पडत असल्याची नाराजी अॅड. गडग यांनी व्यक्त केली. या मार्गाची गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, तुटलेले सिमेंट पाइप आणि खचलेल्या रस्त्यामुळे सुमारे पाच गावांतील ९ ते १० हजार नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. ( Dahanu Road )

Zilla Parishad School: भिंतींना तडे, छताला गळती; धोकादायक इमारतीत ६८ विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी

वारंवार आश्वासने मिळूनही प्रत्यक्ष कामला विलंब

रस्ता दुरुस्तीबाबत वारंवार आश्वासने मिळूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. या पार्श्वभूमीवर दह्याळे, कांदरवाडी आणि ओसरविरा परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदन देत खड्डे तातडीने बुजवण्यासह रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली. पंचायत समिती डहाणूचे कनिष्ठ अभियंता राहुल पिल्ले व आशय भोईर यांच्याकडे
ग्रामस्थांच्यावतीने निवेदन देण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने डहाणू बांधकाम विभागाचे अभियंताही मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित होते. यावेळी दह्याळेचे सरपंच सुनील भोईर, माजी उपसरपंच कमल माळी, धिडे, राजू दळवी, कैलास सुतार, कृष्णा कोब, चितामण पटारा, रुपेश तल्हा, महेंद्र कोब यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

विराज गडग यांची कार्यपद्धतीवर नाराजी

यावेळी अॅड. विराज गडग यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करूनही प्रत्येक वेळी केवळ आश्वासने दिली जात आहेत. हा रस्ता हजारो आदिवासी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा आधार असून विद्यार्थी, महिला, वृद्ध, रुग्ण आणि गरोदर मातांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

खड्यांवर तात्पुरती मलमपट्टी नका करू

लोकप्रतिनिधींनी खड्डे बुजवण्याच्या सूचना करूनही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या सूचनांना प्रशासन किती गांभीर्याने घेते, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता खड्डूचांवर तात्पुरती मलमपट्टी नको तर दर्जेदार आणि कायमस्वरूपी रस्ता दुरुस्ती झाला पाहिजे. सणासुदीपूर्वी काम सुरू झाले नाही, तर ग्रामस्थांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा अॅड. गडग यांनी दिला.

अंमलबजावणी करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन

तात्पुरत्या उपाययोजनांवर प्रशासनाने समाधान न मानता कायमस्वरूपी कामाला तातडीने सुरुवात करण्याची मागणी केली, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले, त्यामुळे पुढील आंदोलनाची भूमिका प्रशासनाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीवर अवलंबून राहणार आहे.

Keval Chaudhary Swimmer: 81 KMचा थरारक जलप्रवास! नदीचा प्रवाह अन् शारीरिक थकव्यावर मात करत केवल चौधरीचा नवा विक्रम

Web Title: Dahanu vaghadi dahyale road potholes rasta roko agitation marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • Bad Road
  • Dahanu

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.