महाबळेश्वर बांधकाम विभाग कार्यालयापासून वेण्णा लेकमार्गे पसरणी घाट, पाचगणी रोड-सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे, हेच ओळखता येत नाही.
मोठ्या शहरांत आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध होत असताना देशाची प्रतिमा झगमगती वाटते. मात्र दुसरीकडे, रस्त्याअभावी अनेक खेड्यांचे हाल सुरूच आहेत. हेही वास्तव आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली येथे येत असल्याचे कळताच संबंधित विभागाने आरमोरी मार्गावरील या खड्ड्यांची रात्रीतूनच किरकोळ दुरुस्ती केली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली असून आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ती सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘पॉटहोल मॅनेजमेंट’ हे नाविन्यपूर्ण ॲप विकसित करण्यात आले.