Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोखाड्यात रोजगार सेवकांकडून संपची हाक! “घर चालवण्यासाठी स्त्रियांचे दागिने गहाण…”

मोखाड्यातील 42 रोजगार सेवकांनी मागील पाच महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे 5 ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 06, 2025 | 04:47 PM
मोखाड्यात रोजगार सेवकांकडून संपची हाक! “घर चालवण्यासाठी स्त्रियांचे दागिने गहाण…”
Follow Us
Close
Follow Us:

दिपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या 42 रोजगार सेवकांना मागील पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. डिसेंबर 2024 पासून आतापर्यंत सातत्याने मानधन न मिळाल्याने रोजगार सेवकांनी 5 ऑगस्ट 2025 पासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे नरेगा योजनेंतर्गत चालणारी सर्व रोहयो कामे ठप्प झाली आहेत आणि या परिस्थितीचा थेट परिणाम मजुर व त्यांच्या कुटुंबीयांवर होणार आहे.

Kolhapur News : शिरोळ तालुक्यातील अकिवाट परिसरात आढळली भलीमोठी मगर; पूल पार करत असतानाच…

रोजगार सेवक 2006 पासून नरेगाच्या माध्यमातून गावपातळीवर काम करत आहेत. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, कामांची देखरेख, हजेरी नोंदवही, मोबाईल अ‍ॅपद्वारे माहिती अपलोड करणे ही सर्व कामे ते प्रामाणिकपणे करत असले तरी मानधन वेळेवर न मिळाल्याने त्यांच्या आयुष्यावर संकट ओढवले आहे. अनेक सेवकांनी सांगितले की, घर चालवण्यासाठी स्त्रियांचे दागिने गहाण ठेवावे लागले, तर काहींनी वाढते कर्ज आणि थकित हफ्त्यांमुळे मानसिक तणावाखाली जीवन जगण्याची वेळ आली आहे.

रोजगार सेवकांच्या मते, नोकरीच्या नावाखाली त्यांच्याकडून पूर्णवेळ काम करून घेण्यात येते, मात्र त्याला मिळणारे मोबदलेच न मिळाल्याने त्यांचा विश्वास शासनावरून उडालेला आहे. त्यांनी एकरकमी थकीत मानधन अदा करणे, प्रवास व अल्पोपहार भत्त्याचा दोन वर्षांचा थकबाकी रक्कम द्यावी, तसेच नवीन शासन निर्णयानुसार वेतन देण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केले आहे.

मजुर वर्गाची मजुरी अदा करण्यात आली असली तरी रोजगार सेवकांना ‘शून्य’ रक्कम मिळाल्याने नरेगाचा कणा असलेले हे कर्मचारी पूर्णतः नाराज झाले आहेत. त्यामुळे योजना थांबणार आणि त्याचा फटका सामान्य मजुरांनाही बसणार आहे.

तारिख ठरली! 31 वी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन ‘या’ दिवशी होणार

भगवान कचरे, तालुका उपाध्यक्ष तथा रोजगार सेवक म्हणतात, “छोट्या मोठ्या कर्जांचे हफ्ते थकले आहेत, घरात अन्न नाही, आता तरी आमचे थकीत मानधन द्यावे.”

संपाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घेऊन मानधन अदा करावे, अन्यथा संपूर्ण मोखाडा तालुक्यात नरेगा योजना कोलमडण्याची शक्यता आहे.

Web Title: Employment workers in mokhada call for strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 04:46 PM

Topics:  

  • palghar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.