Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira-Bhayandar News: मीरा-भाईंदरमध्ये नियम धाब्यावर; निवासी आणि गर्दीच्या ठिकाणी फटाके विक्रीचे स्टॉल

Mira-Bhayandar News: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर शहरात फटाके विक्रीच्या स्टॉलवरून वाद निर्माण झाला आहे. न्यायालयीन आदेश आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून निवासी व गर्दीच्या ठिकाणी स्टॉल उभारल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, नियमबाह्य विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 02, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:
  • मीरा-भाईंदर शहरात अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून फटाके विक्रीचे स्टॉल उभारल्याचा नागरिकांचा आरोप.
  • अंतिम परवानगी आणि आवश्यक मंजुरी मिळण्यापूर्वीच काही स्टॉल उभारून फटाके विक्री सुरू.
  • फटाके विक्रीचे स्टॉल मोकळ्या जागेत किंवा मैदानांमध्ये उभारणे आणि सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक.
 

 

 

न्यायालयाचे आदेश, शासनाचे निर्देश आणि विस्फोटक अधिनियमातील नियमांचे उल्लंघन करून मीरा-भाईंदर शहरात अनेक ठिकाणी फटाके विक्रीचे स्टॉल उभारण्यात आल्याचा आरोप जागरूक नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, अंतिम परवानगी आणि आवश्यक मंजुरी मिळण्यापूर्वीच काही ठिकाणी स्टॉल उभारून फटाके विक्री सुरू करण्यात आली आहे. मात्र, महापालिका आणि पोलिसांकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.

फटाके विक्रीसाठी सार्वजनिक, गर्दीच्या तसेच निवासी परिसरात परवानगी देऊ नये, असे न्यायालयीन आदेश आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. फटाके विक्रीचे स्टॉल मोकळ्या जागेत किंवा मैदानांमध्ये उभारण्यासह त्यासाठी विविध अटी व सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, शहरात अनेक ठिकाणी या नियमांना बगल देऊन स्टॉल उभारण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

गेल्या वर्षीही फटाके विक्री स्टॉलच्या परवानग्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी पुराव्यांसह करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी महापालिका, अग्निशमन दल आणि पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. यंदा सुरुवातीपासूनच नियमबाह्य परवानग्या देऊ नयेत, यासाठी महापौर डिम्पल मेहता, महापालिका पदाधिकारी, आयुक्त तसेच पोलिस अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या.

Navi Mumbai Water Cut : नवी मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! मंगळवारी 10 तास पाणीपुरवठा बंद; अनेक नोडना फटका

निवासी परिसरात उभारले फटाके स्टॉल

यंदा पोलिसांनी काही ठिकाणी नियमबाह्य स्टॉल टाळण्याचा प्रयत्न केला असला, तरी भाईंदर पोलिस ठाणे हद्दीत आणि महापालिका प्रभाग समिती क्रमांक २ मध्ये सर्वाधिक नियमभंग झाल्याचा आरोप आहे. भरवस्तीत, वर्दळीच्या रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी आणि निवासी परिसरात फटाके विक्रीचे स्टॉल उभारण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

MIDC Water Theft: दुष्काळात तेरावा महिना! बदलापूर-कटाई रस्त्यावर पाणीचोरीचा मोठा प्रकार, MIDC चे ४७ कनेक्शन तोडले

त्या विक्रेत्यांवर अद्याप कारवाई का नाही?

विशेष म्हणजे, अंतिम मंजुरी आणि सर्व आवश्यक परवानग्या मिळण्यापूर्वीच काही ठिकाणी स्टॉल उभारण्यात आले असून फटाके विक्रीलाही सुरुवात झाली आहे. अशा विक्रेत्यांवर कारवाई का केली जात नाही? नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मीरा-भाईंदरमध्ये फटाके विक्रीच्या स्टॉलवरून वाद का निर्माण झाला आहे?

    Ans: शहरातील अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून फटाके विक्रीचे स्टॉल उभारल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

  • Que: फटाके विक्रीसाठी कोणत्या परवानग्या आवश्यक आहेत?

    Ans: फटाके विक्रीसाठी संबंधित प्रशासनाची आवश्यक परवानगी आणि विस्फोटक अधिनियमातील नियमांनुसार मंजुरी घेणे आवश्यक असते.

  • Que: अंतिम परवानगीपूर्वी फटाके विक्री सुरू करण्यात आली का?

    Ans: काही ठिकाणी अंतिम मंजुरी आणि आवश्यक परवानग्या मिळण्यापूर्वीच स्टॉल उभारून विक्री सुरू केल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.

Web Title: Mira bhayandar news mira bhayandar firecracker stalls rules violation pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Firecracker
  • mira bhayandar
  • Mira Bhayandar News

संबंधित बातम्या

सहा महिने शिकवूनही पगार नाही! मिरा-भाईंदरमधील ४० शिक्षकांची आर्थिक कोंडी, महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
1

सहा महिने शिकवूनही पगार नाही! मिरा-भाईंदरमधील ४० शिक्षकांची आर्थिक कोंडी, महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Mira Bhayandar मध्ये पाणीटंचाईचा भडका! १० टक्के कपातीच्या नावाखाली प्रत्यक्षात १५ टक्क्यांहून अधिक कपात?
2

Mira Bhayandar मध्ये पाणीटंचाईचा भडका! १० टक्के कपातीच्या नावाखाली प्रत्यक्षात १५ टक्क्यांहून अधिक कपात?

Mira Bhayandar Air Pollution: प्रदूषणाचा कहर! AQI १९२ वर; १५० बांधकामांना नोटिसा, तरी धुळीचे साम्राज्य कायम
3

Mira Bhayandar Air Pollution: प्रदूषणाचा कहर! AQI १९२ वर; १५० बांधकामांना नोटिसा, तरी धुळीचे साम्राज्य कायम

Mira Bhayandar News: भाईंदरमध्ये तिरंगा पत्ती जुगारावर नवघर पोलिसांचा छापा; आठ जणांवर गुन्हा दाखल
4

Mira Bhayandar News: भाईंदरमध्ये तिरंगा पत्ती जुगारावर नवघर पोलिसांचा छापा; आठ जणांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.