Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Varas Land Rights : बेदखल कुळांना मिळणार जमिनीचा हक्क! कूळ कायद्यात सुधारणेला तत्त्वतः मंजुरी; आदिवासी व कष्टकऱ्यांना मोठा दिलासा

Amendment Varas Land Rights : श्रमजीवी संघटनेच्या 'संविधान हक्क संघर्ष मोर्चा'च्या यशस्वी पाठपुराव्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत डहाणू व तलासरी परिसरातील बेदखल कुळांना न्याय देण्यासाठी कूळ कायद्यात सुधारणा करण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 07, 2026 | 11:22 AM
बेदखल कुळांना मिळणार जमिनीचा हक्क! ( सौजन्य - Chatgpt )

बेदखल कुळांना मिळणार जमिनीचा हक्क! ( सौजन्य - Chatgpt )

Follow Us
Follow Us:
  • बेदखल कुळांना मिळणार जमिनीचा हक्क!
  • कूळ कायद्यात सुधारणेला तत्त्वतः मंजुरी
  • आदिवासी व कष्टकऱ्यांना मोठा दिलासा
Amendment Varas Land Rights : श्रमजीवी संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या ‘संविधान हक्क संघर्ष मोर्चा’ नंतर आदिवासी, भूमिहीन आणि कष्टकरी बांधवांच्या न्याय्य हक्कांच्या अंमलबजावणीला प्रशासकीय पातळीवर मोठी गती मिळाली आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी परिसरातील बेदखल कुळांना न्याय देण्यासाठी व प्रत्यक्ष कसल्या जाणाऱ्या वरकस जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करण्यासाठी कुळ कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यास महसूलमंत्र्यांनी तत्त्वतः मंजुरी या बैठकीस आमदार स्नेहा दुबे पंडित, श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा सीता घाटाळ, बाळाराम भोईर आणि विजय जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ( Amendment Varas Land Rights ) 

Vasai Virar News : वसई-विरारमध्ये खळबळ! मुदतबाह्य औषध प्रकरणाचा चौकशी अहवालच गायब; प्रकरण दडपण्याचा गंभीर आरोप

दाखले मिळेपर्यंत लढा अखंड सुरूच राहणार

दरम्यान, मोर्चातून मिळालेले शासन निर्णय केवळ कागदावर न राहता पात्र कुटुंबांना प्रत्यक्ष जमिनीचा हक्क, पक्के घर आणि दाखले मिळेपर्यंत संघटनेचा लढा अखंड सुरूच राहील, अशी ठाम भूमिका राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी मांडली.

नोंदींच्या अभावामुळे वंचित राहिलेल्यांना दिलासा

पिढ्यानपिढ्या जमिनी कसत असूनही केवळ अधिकृत नोंदींच्या अभावामुळे कायदेशीर हक्कापासून वंचित राहिलेल्या हजारो कष्टकरी आदिवासी कुटुंबांसाठी ही सुधारणा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या बैठकीत प्रलंबित वनहक्क दाव्यांचा वेगाने निपटारा करणे, वेठबिगारीतून मुक्त झालेल्यांचे पुनर्वसन, गावठाण विस्तार व आधार कार्ड आणि जन्मदाखले मिळताना येणाऱ्या किचकट अडचणींवर सविस्तर चर्चा झाली.

भूमिहीन कुटुंबांचा विशेष विचार करणार

गावठाण विस्तार योजनेत रोजगारासाठी वीटभट्टधांवर वारंवार स्थलांतर करणाऱ्या भूमिहीन कातकरी कुटुंबांचा विशेष विचार करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. एकाच गावातील सातत्यपूर्ण वास्तव्याचा पुरावा नसल्यामुळे त्यांना हक्काच्या घराच्या जागेपासून वंचित ठेवले जाऊ नये, यासाठी मूळ अधिसूचनेत आवश्यक सुधारणा करण्याची मागणी शासनाने मान्य केली आहे.

संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी होणार निश्चित

विविध विभागांमधील समन्वयाअभावी अथवा कागदपत्रांच्या गुंतागुंतीमुळे कोणताही गरीब लाभार्थी योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी सुटसुटीत कार्यपद्धती आखून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे स्पष्ट निर्देश महसूलमंत्र्यांनी दिले.

Jawhar PWD Scam : ‘बांधकाम ‘मधील गैरव्यवहाराचा पर्दाफाश! अपहारप्रकरणी तिघांना अटक; कर्मचाऱ्यांना पोलिस कोठडी

💡

Frequently Asked Questions

  • Que: बेदखल कुळांना जमिनीचा हक्क मिळवून देण्यासाठी कोणत्या कायद्यात सुधारणा केली जात आहे?

    Ans: पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी परिसरातील वरकस जमिनी कसणाऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि प्रत्यक्ष कसणाऱ्यांच्या नावे जमिनी करण्यासाठी 'कूळ कायद्यात' आवश्यक सुधारणा करण्यास महसूलमंत्र्यांनी तत्त्वतः मंजुरी दिली आहे.

  • Que: गावठाण विस्तार योजनेत कोणत्या भूमिहीन कुटुंबांचा विशेष विचार करण्यात आला आहे?

    Ans: रोजगारासाठी वीटभट्ट्यांवर वारंवार स्थलांतर करणाऱ्या आणि एकाच गावातील सातत्यपूर्ण वास्तव्याचा पुरावा नसलेल्या भूमिहीन कातकरी कुटुंबांचा विशेष विचार करून मूळ अधिसूचनेत सुधारणा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

  • Que: या आंदोलनाचे नेतृत्व कोण करत आहे आणि त्यांची भूमिका काय आहे?

    Ans: श्रमजीवी संघटनेच्या वतीने हा लढा उभारण्यात आला असून, पात्र कुटुंबांना प्रत्यक्ष जमिनीचा हक्क, पक्के घर आणि दाखले मिळेपर्यंत लढा अखंड सुरूच राहील, अशी ठाम भूमिका राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी मांडली आहे.

Web Title: Land rights for tenant farmers palghar dahanu talasari ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • palghar

संबंधित बातम्या

Jawhar PWD Scam : ‘बांधकाम ‘मधील गैरव्यवहाराचा पर्दाफाश! अपहारप्रकरणी तिघांना अटक; कर्मचाऱ्यांना पोलिस कोठडी
1

Jawhar PWD Scam : ‘बांधकाम ‘मधील गैरव्यवहाराचा पर्दाफाश! अपहारप्रकरणी तिघांना अटक; कर्मचाऱ्यांना पोलिस कोठडी

राजकारणातील परिचित चेहरा हरपला; बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्यासोबत काम, निष्ठावंत शिवसैनिक Shirish Chavan काळाच्या पडद्याआड
2

राजकारणातील परिचित चेहरा हरपला; बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्यासोबत काम, निष्ठावंत शिवसैनिक Shirish Chavan काळाच्या पडद्याआड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.