Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar FDA Action : पालघरमध्ये FDA चं ‘ऑपरेशन क्लिन’! 1 कोटी 37 लाखांचा बनावट अन्नसाठा सील, 5 परवाने निलंबित, गुटख्यावरही कारवाई

Palghar FDA Action : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने पालघर जिल्ह्यात धडक मोहीम हाती घेतली आहे. जून आणि जुलै महिन्यात ६१ अन्न आस्थापनांची तपासणी करून १ कोटी ३७ लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 14, 2026 | 11:47 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पालघरात भेसळखोरांना FDA चा दणका
  • १ कोटी ३७ लाखांचा अन्नसाठा जप्त
  • गुटखा पानमसाल्यावरही कारवाई
Palghar FDA Action : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पालघर जिल्ह्यात धडक मोहीम हाती घेतली आहे. जून आणि जुलै या दोन महिन्यांत पालघर परिमंडळ-१ अंतर्गत तब्बल ६१ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर ( Palghar FDA Action ) कारवाई करत तब्बल १ कोटी ३२ लाख ८४ हजार ३९४ रुपये किंमतीचा आणि ४२ हजार ३५३ किलोहून अधिक अन्नसाठा जप्त करण्यात आला. विविध कारवायांमुळे हा आकडा सुमारे १ कोटी ३७ लाख रुपयांपर्यंत पोहोचला असून, अन्न व्यवसायातील नियम धाब्यावर बसवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Vasai Fake Currency : वसईत मोठा पर्दाफाश, 1 कोटींच्या बनावट नोटा जप्त, 30 लाखांत विक्रीचा होता डाव

दंडापोटी २ लाख ७ हजार ५०० रुपये वसूल

एफडीएच्या पथकाने हॉटेल, उपाहारगृहे, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे व अन्य अन्न आस्थापनांची तपासणी केली. यावेळी अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, भेसळ, कीटक व उंदीर नियंत्रणाची व्यवस्था, कामगारांची वैद्यकीय तपासणी, अग्निशामक यंत्रणा तसेच अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या वैध परवान्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळलेल्या पाच आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. तसेच तडजोड दंडापोटी २ लाख ७ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी केवळ खासगी व्यावसायिकांची नसून शासकीय आस्थापनांचीही असल्याचे एफडीएच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

कँटीनमध्येही त्रुटी आढळल्याने कारवाई

जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक कार्यालयातील कँटीनमध्येही त्रुटी आढळल्याने कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे अन्न सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कोणत्याही आस्थापनाला अभय दिले जाणार नसल्याचा संदेश प्रशासनाने दिला आहे. हॉटेलमध्ये पनीरपासून तयार केलेल्या पदार्थांबाबत ग्राहकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी पदार्थांच्या स्वरूपाची स्पष्ट माहिती देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांना मोठी मागणी असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या व्यावसायिकांवर एफडीएची करडी नजर राहणार आहे.

गुटखा पानमसाल्याविरोधात स्वतंत्र कारवाया

प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या विक्रीविरोधातही एफडीएने स्वतंत्रपणे सात कारवाया केल्या. या कारवायांमध्ये ४ लाख ३२ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

‘अन्न व औषध’ची पनीरच्या गुणवत्तेवर करडी नजर

पनीरच्या गुणवत्तेबाबत एफडीएकडून विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत ३२ पनीरचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी नऊ नमुने प्रमाणित, तर एक नमुना असुरक्षित आढळला आहे. उर्वरित २२ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. हॉटेल आणि उपाहारगृहांमध्ये पनीरच्या नावाखाली निकृष्ट किंवा पर्यायी पदार्थ ग्राहकांना देण्यात येत नाहीत ना, याचीही तपासणी केली जात आहे.

निकृष्ट दर्जाच्या मालाचा वापर केल्यास कठोर कारवाई

गणपती, नवरात्र आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई विक्रेत्यांवरही एफडीएची विशेष नजर राहणार आहे. मिठाई तयार करण्यासाठी वापरला जाणारा खवा, मावा, दूध, तूप व अन्य कच्चा माल यांची तपासणी केली जाणार आहे. मिठाईंमध्ये भेसळ अथवा निकृष्ट दर्जाच्या कच्च्या मालाचा वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

Palghar Land Records Scam : शासकीय मोजणीचे कोट्यवधी रुपये खासगी खात्यात? भूमी अभिलेख अधिकाऱ्याचा कारनामा; बदलीनंतर भांड फुटलं!

Web Title: Palghar fda action raid hotels canteens gutkha and paneer samples seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • FDA
  • FDA Action
  • FDA Raid
  • Marathi News
  • palghar
  • Palghar news

संबंधित बातम्या

Marathi Actress: ‘बाबांनी स्वप्नांना कधीच…’;अभिनेत्रीने सांगितला स्वातंत्र्याचा खरा अर्थ
1

Marathi Actress: ‘बाबांनी स्वप्नांना कधीच…’;अभिनेत्रीने सांगितला स्वातंत्र्याचा खरा अर्थ

Investment Rules : लाखो रुपये असूनही वेळेवर वापरता येत नाहीत? Dead Money  च्या जाळ्यात अडकण्याआधी व्हा सतर्क
2

Investment Rules : लाखो रुपये असूनही वेळेवर वापरता येत नाहीत? Dead Money च्या जाळ्यात अडकण्याआधी व्हा सतर्क

IIT Delhi AI Course: AI क्षेत्रात करिअरची संधी! IIT Delhiच्या नव्या कोर्सेससाठी असा करा अर्ज
3

IIT Delhi AI Course: AI क्षेत्रात करिअरची संधी! IIT Delhiच्या नव्या कोर्सेससाठी असा करा अर्ज

FDA News: आता एजंटची पण खैर नाही…! ‘परवाना मिळवून देतो’ म्हणत पैशांची मागणी करणाऱ्यांपासून सावध, FDA चा इशारा
4

FDA News: आता एजंटची पण खैर नाही…! ‘परवाना मिळवून देतो’ म्हणत पैशांची मागणी करणाऱ्यांपासून सावध, FDA चा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.