Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिंचणी ग्रामपंचायतीत दप्तर घोटाळा उघड; ग्रामसभेत कबुली, तीन महिन्यांपासून महत्त्वाची कागदपत्रे गायब असल्याचे स्पष्ट

डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रांमपंचायतीमधील एक मोठा घोटाळा उघड झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपसून अनेक महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 18, 2025 | 03:55 PM
Chinchani Gram Panchayat

Chinchani Gram Panchayat

Follow Us
Close
Follow Us:
  • चिंचणी ग्रामपंचायतीत दप्तर घोटाळा उघड
  • ग्रामसभेत कबुली
  • तीन महिन्यांपासून महत्त्वाची कागदपत्रे गायब असल्याचे स्पष्ट
बोर्डी (वा.) : चिंचणी गावातील ग्रामपंचायत प्रशासनात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या गंभीर फसवणुकीचा प्रकार अखेर सोमवार दि.१५ डिसेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत उघडकीस आला. सातत्यान पाठपुरावा करूनही महत्त्वाची कागदपत्र उपलब्ध न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, ग्रामविकास अधिकाऱ्यांनीच कागदपत्रे दप्तर नसल्याची कबुली दिल्याने या प्रकरणाल गंभीर वळण लागले आहे. ग्रामसभेत सध्याच्या ग्रामविकास अधिकारी प्रतिक्ष बारी-करबट यांनी ग्रामपंचायतीची अनेक अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे दप्तरी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.

माहितीनुसार, काही कागदपत्रे गेल्या तीन महिन्यांपासून सील अवस्थेत असून, अनेक आवश्यक नोंदी व दस्तऐवज गायब असल्याचे आढळून आले आहे. पदभार स्वीकारताना माजी ग्रामविकासा अधिकारी मिलिंद गायकवाड यांनी ही कागदपत्रे ताब्यात दिलेली नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून ग्रामसभेत करण्यात आला.

हे देखील वाचा : शिरोलीत ऊसाच्या फडाला भीषण आग; 30 एकर ऊस जळून खाक, वेळीच खबरदारी घेतली म्हणून…

अखेर कागदपत्रे उपलब्ध नसल्याची दिली कबुली

या संदर्भात चिंचणी गावातील सुमारे १५ ग्रामपंचायत सदस्य व जागरूक नागरिकांनी गेल्या तीन महिन्यांपासून प्रशासनाकडे कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून केवळ चालढकल करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सोमवारी झालेल्या ग्रामसभेत ही कागदपत्रे तातडीने जनतेसमोर सादर करण्याची मागणी करण्यात आली असता, तब्बल दीड तास टाळाटाळ करण्यात आली. अखेर सायंकाळी ७.४५ वाजता कागदपत्रे उपलब्ध नसल्याची कबुली दिली.

दरम्यान, याबाबत ग्रामपंचायत अधिकारी प्रतीक्षा बारी-करबट यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी मोबाईलवर संपर्क केला असता त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. जर कागदपत्रे ग्रामपंचायत दप्तरी नसतील, तर ती नेमकी कोणाच्या ताब्यात आहेत किंवा चोरीला गेली आहेत का? याबाबत चिंचणीच्या नागरिकाना रक्ष्ट माहिती दिली पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक ठेवून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांकडून करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Sambhajinagar MNC Election: छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीची तयारी सुसाट! मतदानासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज

पंचायत समिती, डहाणूच्या गट विकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी म्हटले आहे की, ८८ नवीन ग्रामपंचायत अधिकारी हजर झाल्यानंतर त्यांनी कार्यभार स्वीकारताना संबंधित बाजें यादी पंचायत समितीला सादर केलेली आहे. तरीही दप्तर गहाळ झाल्याबाबत लेखी तक्रार प्राप्त झाल्यास, त्याची सखोल चौकशी करून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.

Web Title: Record scam exposed in chinchani gram panchayat admission in gram sabha as key documents missing for three months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 03:55 PM

Topics:  

  • maharashtra news
  • navarahstra news

संबंधित बातम्या

Ram Sutar passed away : जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन; कलाक्षेत्रात पसरली शोककळा
1

Ram Sutar passed away : जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन; कलाक्षेत्रात पसरली शोककळा

Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह
2

Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन
3

Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

‘महावितरण’ने फेडले 12800 कोटींचे कर्ज; कर्ज, स्वनिधीतून केली कर्जाची परतफेड
4

‘महावितरण’ने फेडले 12800 कोटींचे कर्ज; कर्ज, स्वनिधीतून केली कर्जाची परतफेड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.