Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: ना बंगला, ना झगमगाट… पालकमंत्र्यांनी साजरी केली बंजारा बांधवांसोबत दिवाळी

Jalgaon News: जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील पोखरी बंजारा तांड्यात ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी बंजारा समाजातील महिला, वडीलधारी मंडळी आणि लहान मुलांसोबत संवाद साधत त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 09, 2026 | 06:35 PM
Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पोखरी बंजारा तांड्याला भेट.
  • बंजारा बांधवांसोबत एकाच पंगतीत दिवाळी फराळ.
  • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अतिरिक्त मदतीची ग्वाही.

 

Gulabrao Patil Celebrates Diwali with Banjara Community:  जळगाव (वा.) दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा प्रज्वलित करीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी धरणगाव तालुक्यातील पोखरी बंजारा तांड्यात ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी केली. कोणताही शासकीय थाट किंवा औपचारिकता न ठेवता त्यांनी बंजारा समाजातील महिला, वडीलधारी मंडळी आणि चिमुकल्यांसोबत वेळ घालवला. ग्रामस्थांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.. Jalgaon News:

या भेटीमुळे तांड्यातील ग्रामस्थांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला. पालकमंत्री पाटील यांचे तांड्यात आगमन होताच पारंपरिक वेशभूषेतील महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. यावेळी महिला व पुरुषांनी बंजारा आणि पावरा गीतांवर पारंपरिक नृत्य सादर केले. गीत-संगीत आणि नृत्यातून बंजारा संस्कृतीचे दर्शन घडले. पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

एकाच पंगतीत फराळाचाही घेतला आस्वाद

पालकमंत्री म्हणून नव्हे, तर कुटुंबातील सदस्याप्रमाणे ग्रामस्थांसोबत एकाच पंगतीत बसून त्यांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. त्यांच्या या साधेपणाचे ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी शेतकऱ्यांनी कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी मांडल्या. शासनाने जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीव्यतिरिक्त आणखी मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना नक्कीच मदत करेल, अशी ग्वाही गुलाबराव पाटील यांनी दिली.

Jalgaon News: ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत खडा पहारा ! अंजनी धरणातून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

कुटुंबासोबत आपल्याच दिवाळी केल्याची अनुभूती

दुष्काळामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे अडचणीत आहेत. अशा वेळी आपल्या माणसांच्या सुखदुःखात सहभागी होणे महत्त्वाचे आहे. पोखरी तांड्यातील माता-भगिनी, वडीलधारी मंडळी आणि चिमुकल्यांसोबत दिवाळी साजरी करताना आपल्याच कुटुंबात सण साजरा केल्याचे समाधान मिळाल्याची भावना पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

Jalgaon News: १०८ पाठोपाठ १०२ ही डळमळीत ! २४ तासांसाठी एकच कंत्राटी चालक; प्रसूतीसाठीही रुग्णांची गैरसोय

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी प्रताप पाटील, सरपंच गोकुळ शिंदे, उपसरपंच नवल पारधी, सदस्य महेंद्र पाटील, संतोष वंजारी, किसन राठोड, रामलाल चव्हाण, इंदल चव्हाण, धनराज राठोड, गुलाब चव्हाण, पांडुरंग चव्हाण, हिरालाल चव्हाण, ताराचंद चव्हाण, गोविंदा सोनवणे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंजारा समाजातील महिला, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिवाळी कुठे साजरी केली?

    Ans: त्यांनी धरणगाव तालुक्यातील पोखरी बंजारा तांड्यात ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी केली.

  • Que: दिवाळीनिमित्त पोखरी तांड्यात कोणते सांस्कृतिक कार्यक्रम झाले?

    Ans: बंजारा आणि पावरा गीतांवर पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले.

  • Que: गुलाबराव पाटील यांनी ग्रामस्थांसोबत काय केले?

    Ans: त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला आणि एकाच पंगतीत बसून दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला.

Web Title: Gulabrao patil diwali celebration banjara community pokhari tanda jalgaon rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • Jalgaon News
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Gokul गिळंकृत करण्याचा डाव? कोल्हापुरात मोठा संघर्ष पेटला!
1

Gokul गिळंकृत करण्याचा डाव? कोल्हापुरात मोठा संघर्ष पेटला!

Sanjay Shirsat:  छत्रपती संभाजीनगरमध्ये अनोखी दिवाळी! मंत्री संजय शिरसाठ आक्रमक
2

Sanjay Shirsat: छत्रपती संभाजीनगरमध्ये अनोखी दिवाळी! मंत्री संजय शिरसाठ आक्रमक

Jalgaon News: अन्नभेसळीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर! अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
3

Jalgaon News: अन्नभेसळीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर! अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Jalgaon News: मामेभावाशी लग्न करण्याचा हट्ट ठरला आयुष्याचा शेवटचा निर्णय? 10 महिन्यांत संसार उद्ध्वस्त
4

Jalgaon News: मामेभावाशी लग्न करण्याचा हट्ट ठरला आयुष्याचा शेवटचा निर्णय? 10 महिन्यांत संसार उद्ध्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.