Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: अन्नभेसळीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर! अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Jalgaon News: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कजगावमध्ये अन्नभेसळीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सणासुदीच्या काळात मिठाई, खाद्यतेल, दुग्धजन्य पदार्थ आणि फराळाच्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याने त्यांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 08, 2026 | 06:38 PM
Jalgaon News: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Jalgaon News: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कजगावमध्ये दिवाळीच्या काळात अन्नभेसळीची चिंता वाढली.
  • मिठाई, खाद्यतेल आणि फराळाच्या पदार्थांच्या तपासणीची मागणी.
  • अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी.

कजगाव (वा.) सणासुदीचे दिवसजवळ आले असताना कजगाव येथे अन्नभेसळीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मिठाई, खाद्यतेल, दुग्धजन्य पदार्थ, फराळाचे साहित्य तसेच विविध खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असते. मात्र, या पदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि अन्नसुरक्षेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाकडे यापूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारींवर नेमकी कोणती कार्यवाही झाली, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Jalgaon News:

या बाबींची प्रत्यक्ष तपासणी

कजगाव परिसरातील खाद्यपदार्थ विक्री करणारी दुकाने, हॉटेल्स, सुपर मॉल्स तसेच मिठाई विक्रेत्यांच्या ठिकाणी नियमित तपासणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून वारंवार होत आहे. विशेषतः अन्नपदार्थांची साठवणूक, उत्पादनाची तारीख, मुदत संपलेली उत्पादने, स्वच्छता, खाद्यतेलाचा वापर आणि अन्नपदार्थामध्ये होणारी संभाव्य भेसळ या बाबींची प्रत्यक्ष तपासणी होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Diwali 2026: घरात सुख-समृद्धी नांदावी म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठेवा या 2 वस्तू, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

प्रशासनाने तपासणी करून अहवाल जाहीर करावा

कजगावमधील सर्व मिठाई दुकाने, किराणा दुकाने, हॉटेल्स, सुपर मॉल्स आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची विशेष तपासणी करण्यात यावी. संशयास्पद खाद्यपदार्थाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. तसेच यापूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीची माहिती नागरिकांसमोर जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तातडीने तपासणी मोहीम राबवावी, अन्यथा अन्नसुरक्षेचा प्रश्न केवळ कागदोपत्रीच राहणार का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

निकृष्ट दर्जामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका

भेसळयुक्त अथवा निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात. दिवाळीसारख्या सणाच्या काळात लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर मिठाई व इतर खाद्यपदार्थाचे सेवन करतात, त्यामुळे प्रशासनाने केवळ तक्रारीची वाट न पाहता प्रतिबंधात्मक तपासणी मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

Jalgaon News: मामेभावाशी लग्न करण्याचा हट्ट ठरला आयुष्याचा शेवटचा …

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याची भावना काही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कजगावकडे गांभीर्याने लक्ष देऊन तक्रारीची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अन्नभेसळीचा प्रश्न पुन्हा चर्चेत का आला आहे?

    Ans: खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केल्यामुळे हा प्रश्न चर्चेत आला आहे.

  • Que: अन्न व औषध प्रशासनाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम का आहे?

    Ans: अन्नभेसळीच्या तक्रारींवर नेमकी कोणती कारवाई झाली, याबाबत स्पष्ट माहिती नसल्याने संभ्रम आहे.

  • Que: नागरिकांची प्रशासनाकडे काय मागणी आहे?

    Ans: अन्नपदार्थांची तपासणी करून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आहे.

Web Title: Food adulteration issue citizens question food drug administration action rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • Jalgaon News
  • maharashtra news
  • Poltical News

संबंधित बातम्या

Jalgaon News: मामेभावाशी लग्न करण्याचा हट्ट ठरला आयुष्याचा शेवटचा निर्णय? 10 महिन्यांत संसार उद्ध्वस्त
1

Jalgaon News: मामेभावाशी लग्न करण्याचा हट्ट ठरला आयुष्याचा शेवटचा निर्णय? 10 महिन्यांत संसार उद्ध्वस्त

Jalgaon News: ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत खडा पहारा ! अंजनी धरणातून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’
2

Jalgaon News: ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत खडा पहारा ! अंजनी धरणातून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

Maharashtra Dengue News: नागपुरात डॉक्टर-विद्यार्थ्यांना लागण, तर सोलापूरमध्ये आठ वर्षीय बालकाचा मृत्यू!
3

Maharashtra Dengue News: नागपुरात डॉक्टर-विद्यार्थ्यांना लागण, तर सोलापूरमध्ये आठ वर्षीय बालकाचा मृत्यू!

Jalgaon News:  १०८ पाठोपाठ १०२ ही डळमळीत ! २४ तासांसाठी एकच कंत्राटी चालक; प्रसूतीसाठीही रुग्णांची गैरसोय
4

Jalgaon News: १०८ पाठोपाठ १०२ ही डळमळीत ! २४ तासांसाठी एकच कंत्राटी चालक; प्रसूतीसाठीही रुग्णांची गैरसोय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.